तेरा लाख विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची कोणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:55+5:302021-09-10T04:48:55+5:30
ठाणे : जिल्ह्यात पहिली ते दहावीचे १३ लाख ११ हजार २७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांपैकी सुरू झालेल्या ...
ठाणे : जिल्ह्यात पहिली ते दहावीचे १३ लाख ११ हजार २७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांपैकी सुरू झालेल्या शाळांमध्ये तीन हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
------------
३) सॅनिटायझेशन करा, पण पैसे देणार कोण?
---
गेल्या दोन वर्षांपासून वेतनेतर अनुदान अजून शाळांना प्राप्त नाही. सॅनिटायझर करण्यासाठी मुख्याध्यापकांना खरोखरच हा पैसा कोठून आणावयाच्या हा ताणतणाव आहेच. थर्मल गन अन्य स्वच्छता साहित्य याचाही खर्च कसा करावा, याच्या संकट आहे. शासनाने निश्चितपणे त्याचा विचार करून शाळांना हा खर्च देण्याची व्यवस्था करावी.
- ज्ञानेश्वर म्हात्रे
अध्यक्ष- मुख्याध्यापक संघ, ठाणे.
-------
५) शिक्षणाधिकारी काय म्हणतात?-
- जिल्ह्यातील गांवपाडे, शहर कोरोनामुक्त असल्यास तेथील ग्रामपंचायत, पालकांची संमती आदीची परवानगी घेऊन शाळा सुरू झाल्या. आतापर्यंत ३९ शाळा सुरू आहेत. गाव कोरोनामुक्त असल्याने मुलाच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणारच नाही. कदाचित घटना घडली तर जवळची प्राथमिक आरोग्यकेंद्र तैनात आहेत. शासन आदेशानुसार शाळा सुरू केल्या आहेत. काही शाळा परवानगी आणि पालकांच्या संमतीने होतील.
- शेषराव बढे, जिक्षणाधिकारी, ठाणे