बेपत्ता गायकवाडांनंतर सोनावणे यांचाही मृत्यू; तिसऱ्याच रुग्णाच्या नावे उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:10 PM2020-07-08T16:10:27+5:302020-07-08T16:10:56+5:30
रुग्णालय प्रशासनाने दोन्ही कुटुंबांची माफी मागितली. परंतु यातून दोनही कुटुंबांच्या भावनेशी खेळल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
ठाणे : कोवीड केअर सेंटरमधून 72 वर्षीय कोरोना बाधीत बेपत्ता झालेल्या गायकवाड यांना सोनावणे कुटुंबाने अग्नी दिल्यानंतर आता तो मृतदेह त्यांचा नसून गायकवाड यांचा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दुखा:तून सावरत असतांनाच आता सोनावणे यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोनावणे कुटुबियांच्या पाया खालची वाळूच सरकली आहे. तिकडे गायकवाड कुटुंबाला तर आपल्या वडीलांच्या अस्थी देखील अद्याप मिळालेल्या नाहीत. विशेष म्हणजे सोनावणे यांच्यावर मोरे यांच्या नावाने उपचार रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आल्याची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. मुळात मोरे यांना सोनावणे दाखल होण्यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाचा फटका ठाणे कर नागरीकांना बसत आहे.
ठाण्याच्या नव्या सुरु झालेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये 29 जून रोजी सोनावणे आणि गायकवाड हे एकाच दिवशी अॅडमीट झाले होते. त्यानंतर 3 जुलै रोजी सोनावणे कुटुंबियांना फोन करुन त्यांच्या सदस्याचा मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. परतु त्यानंतर गायकवाड कुटुंबियांनी त्यांच्या सदस्याचा शोध सुरु केला. दोन दिवस त्यांचा शोध सुरु होता. यावरुन ठाण्यातील वातावरण चांगलेच गरम झाले होते. ठाणो मतदाता जागरण अभियानच्या माध्यमातून कापुरबावडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. तर भाजपने देखील त्यांचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला अल्टीमेंटम दिले होते. महापौर नरेश म्हस्के यांनी देखील प्रशासनावर या संदर्भात आगपाखड केली होती. शहरात या घडामोडी सुरु असतांनाच सोनावणो यांच्या कुटुबियांना फोन करुन सांगण्यात आले की तुमचे सदस्य अॅडमीट असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते, गायकवाड होते. त्यामुळे येऊन तुम्ही पाहू शकता असेही सांगण्यात आले. तर 7 जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बोलावण्यात येऊन ओळख परेड घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता. तो र्पयत गायकवाड यांच्या कुटुंबियांनाही फोन करुन त्यांच्या सदस्याचा मृत्यु झाला असून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला.
रुग्णालय प्रशासनाने दोन्ही कुटुंबांची माफी मागितली. परंतु यातून दोनही कुटुंबांच्या भावनेशी खेळल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
दरम्यान प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळातून सोनावणे कुटुंब सावरत असतांनाच रुग्णालयातून मंगळवारी रात्री उशिरा फोन करुन, त्यांच्या सदस्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आधी सोनावणे म्हणून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते सोनावणो नव्हतेच, यातून सावरत असतांनाच आता त्यांचे आता त्यांना सोनावणे गेल्याचा फोन आल्याने पाया खालचीच वाळू सरकली आहे. प्रशासनाच्या एका चुकीमुळे सोनावणो आणि गायकवाड कुटुबांच्या भावनेशीच खेळण्याचा हा प्रकार केला आहे. त्यामुळे यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानचे सदस्य उन्मेश बागवे यांनी केली आहे. या दोनही कुटुंबांना 5क् लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
आदल्या दिवशी एका रुग्णाला डिस्चार्ज
सोनावणे यांना 29 जून रोजी कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या आदल्या दिवशी मोरे नावाच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर सोनावणे यांच्यावर मोरे यांच्या नावाने उपचार सुरु होते. अशी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
प्रशासनाच्या चुकीचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आधी सांगितले जाते की तुमचे वडील गेले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा फोन येतो की तुमचे सदस्य जिवंत आहेत. हा प्रशासनाचा सावळा गोंधळ आहे, त्यात आता पुन्हा आम्ही आमच्या वडीलांना गमावले आहे. त्यामुळे आता दुहेरी दु:खाचा डोंगर आमच्यावर कोसळला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर शासन झालेच पाहिजे.
(संदीप सोनावणे - सोनावणे यांचे नातेवाईक)दोन दिवस आम्ही आमच्या वडीलांना शोधत होतो. परंतु त्यांच्यावर चुकीच्या नावाने प्रशासनाकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. आम्हाला अजून आमच्या वडीलांच्या अस्थी देखील मिळालेल्या नाहीत. आम्ही आमच्या कुटुंबाचा आधार गमावलेला आहे. यात आता प्रशासन संबधींतावर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.
(मेहुल गायकवाड - गायकवाड यांचे नातेवाईक)