‘सोनू तुझा माझ्यावर...’ गरबाप्रेमी थिरकणार, सरावाला जोर, वेस्ट़र्नऐवजी पारंपरिक संगीतावर ताल धरण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:39 AM2017-09-13T06:39:44+5:302017-09-13T06:39:44+5:30

‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने सर्वांना वेड लावले असताना यंदा नवरात्रौत्सवात ठाण्यातील गरबाप्रेमी या गाण्यावर थिरकरणार आहेत. गतवर्षी गरब्यामध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’चा फिव्हर होता. यंदा मात्र ‘सोनू...’चा तडका दिसून येणार आहे. गणेशोत्सवानंतर ठाणेकरांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या आठ दिवसांवर हा उत्सव आला आहे.

'Sonu you want me ...' Garbapramemi will throw away, Sarova's thriller, rather than Western, to catch the rhythm of traditional music. | ‘सोनू तुझा माझ्यावर...’ गरबाप्रेमी थिरकणार, सरावाला जोर, वेस्ट़र्नऐवजी पारंपरिक संगीतावर ताल धरण्याकडे कल

‘सोनू तुझा माझ्यावर...’ गरबाप्रेमी थिरकणार, सरावाला जोर, वेस्ट़र्नऐवजी पारंपरिक संगीतावर ताल धरण्याकडे कल

Next

- प्रज्ञा म्हात्रे 
ठाणे : ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने सर्वांना वेड लावले असताना यंदा नवरात्रौत्सवात ठाण्यातील गरबाप्रेमी या गाण्यावर थिरकरणार आहेत. गतवर्षी गरब्यामध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’चा फिव्हर होता. यंदा मात्र ‘सोनू...’चा तडका दिसून येणार आहे.
गणेशोत्सवानंतर ठाणेकरांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या आठ दिवसांवर हा उत्सव आला आहे. उत्सवात गरबा खेळण्यासाठी गरबाप्रेमींचा उत्साह दिसून येत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन महिने अगोदर सिझनल क्लासेस सुरू झाले आहेत. हौशी आणि स्पर्धेत सहभागी घेणारे मुरब्बी गरबाप्रेमी या क्लासेसमध्ये जाऊन रितसर गरबा शिकतात. जसजसे दिवस जवळ येतात तसतसा गरबाप्रेमींचा सराव जोर धरतो. दरवर्षी गरबा शिकवणारे नृत्यदिग्दर्शक हे नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करतात. यंदा नृत्यदिग्दर्शिका वैशाली सत्रा यांनी ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्यावर गरबा बसवला आहे. १४ स्टेप्सचा हा गरबा असून या गरब्याला हिपॉपची जोड दिली गेली आहे. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही ट्रॅकवर हा गरबा खेळला जाऊ शकतो. ५ वर्षाच्या बाल गरबाप्रेमींपासून ६० वर्षाचे गरबाप्रेमी आजोबा हा नवीन गरबा खेळू शकतात. यात कितीही गरबाप्रेमी सहभागी होऊ शकतात, असे वैशाली यांनी सांगितले. याखेरीज ‘कपल दोडियो साल्सा’ या प्रकारचा ट्रेण्ड दिसून येत आहे. लहान मुलेही हा गरबा खेळू शकतात. २३ स्टेप्सचा हा गरबा असून १५ ते २० जणांचा ग्रुपने हा गरबा खेळता येतो. ‘मोर बनी थन घाट करे’ या गाण्यावर देसी गरब्याचा सराव सुरू आहे. १२ स्टेप्सचा हा गरबा आहे आणि वेगळा प्रयोग यात करण्यात आला आहे. पूर्णपणे पारंपारिक टच असलेला हा गरबा आहे. त्यानंतर साधा गरबा, पोपट, चकरी गरबा, तीन ताली गरबा यांसारखे नेहमीचे प्रकार देखील गरब्यात पाहायला मिळणार आहे.

देसी गरब्याचा बोलबाला : गरब्यात मध्यंतरीच्या काळात वेस्टर्न गरब्याची धूम होती. प्रामुख्याने तरुणाई या गरब्याकडे आकर्षित होत होती. त्यामुळे गरबा शिकवणारे प्रशिक्षकही नवनवीन वेस्टर्न स्टेप्स आणि त्याप्रमाणे कॉस्च्युम परिधान करायला सांगून त्यांना शिकवित होते. पण यंदा या तरुणाईने देसी गरब्याला जास्त पसंती दिली आहे. स्पर्धेत उतरणाºया तरुणाईचा हा गरबा शिकण्याकडे जास्तीत जास्त कल असल्याचे गरब्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले.

यंदा गरब्यात आम्हाला नवीन प्रयोग करायचा होता. सध्या ‘सोनू...’ हे गाणे लहानांपासून मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. म्हणून या गाण्याची निवड करुन हिपॉप स्टाईलमध्ये हा गरबा सेट केला आहे. सध्या याचा सराव गरबाप्रेमींकडून करुन घेतला जात आहे आणि प्रत्येकजण हा गरबा एन्जॉय करीत आहे.
- वैशाली सत्रा, नृत्यदिग्दर्शिका

प्रॉप्स वापरुनही वेगवेगळ््या प्रकारांत गरबा खेळता येतो. थाळी, छत्री, दुपट्टा यांसारखे प्रॉप्स घेऊन गरबा खेळण्याचा सरावही सुरू आहे. स्पर्धेत उतरणारे गरबाप्रेमी या प्रॉप्सचा वापर करुन गरबा खेळणार आहेत असे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Sonu you want me ...' Garbapramemi will throw away, Sarova's thriller, rather than Western, to catch the rhythm of traditional music.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.