सुपर स्पेशिलटी हॉस्पिटलसाठी ठाणे सिव्हील रूग्णालयाचे लवकरच स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 08:11 PM2019-01-07T20:11:09+5:302019-01-07T20:16:23+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी या रूग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास अनुसरून पालकमंत्र्यांनी या रूग्णालयाचे लवकरच स्थलांतर करून काम सुरू करण्यासाठी मंजुरी देखील मिळवल्याचे सांगितले. या रूग्णालयांची तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी सुमारे चार ठिकाणाची यादी या बैठकीत चर्चेला आली. यामध्ये मेंटल हॉस्पिटलसह मुंब्रा कौसा येथील महापालिकेची इमारत, माजीवडा, कशीश पार्क आदी ठिकाणी इमारती उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. पण रूग्णाच्या सोयीनुसार या इमारतीत रूग्णालय सुरू करणे शक्य
ठाणे : येथील सिव्हील रूग्णालयाचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार आहे. त्यासाठी या रूग्णालयाच्या दोन्ही इमारती पाडण्यात येणार आहे. तत्पुर्वी या रूग्णालयाचे अन्यत्र स्थलांतरीत करण्याची अपेक्षा पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी या रूग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास अनुसरून पालकमंत्र्यांनी या रूग्णालयाचे लवकरच स्थलांतर करून काम सुरू करण्यासाठी मंजुरी देखील मिळवल्याचे सांगितले. या रूग्णालयांची तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी सुमारे चार ठिकाणाची यादी या बैठकीत चर्चेला आली. यामध्ये मेंटल हॉस्पिटलसह मुंब्रा कौसा येथील महापालिकेची इमारत, माजीवडा, कशीश पार्क आदी ठिकाणी इमारती उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. पण रूग्णाच्या सोयीनुसार या इमारतीत रूग्णालय सुरू करणे शक्य नसल्याचा सूर देखील यावेळी ऐकायला मिळाला.
वागळे इस्टेटमधील कामगार रूग्णालयाच्या इमारतीमध्ये सिव्हील रूग्णालय शिफ्ट करण्याचे आधी ठरले होते. पण रूग्णांच्या सोयीनुसार ती जागा अयोग्य असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गोरगरीबांचे या सिव्हील रु ग्णालयाकडे पाहिले जाते. पण या रु ग्णालयाच्या मुख्य इमारतीसह त्याच्या शेजारील इमारत धोकादाय स्थितीत असल्यामुळे त्या वेळीच पाडाव्या लागणार असल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीमध्ये यावेळीही चर्चेला आला आहे. रूग्णालय या इमारतींच्या विविध विभागातील प्लास्टर व स्लॅब निखळल्याचा घटना या आधी घडल्या आहेत.
या रु ग्णायाचे निर्लेखन करु न नवीन इमारत उभारणी न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकरता येत येणार नसल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला. सुमारे जूनपर्यंत या रूग्णालयाचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्याच्या दृष्टीने महापालिकांच्या इमारतींची पहाणी सुरू केल्याचे या रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार सभागृहात स्पष्ट केले. या रूग्णालयाच्याधोकादाय इमारतीतील काही विभाग रूग्णालयासामोरील निर्संग हॉस्टेलमध्ये तर, काही विभाग जिल्हा प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या आवारातील ट्रेनिंग सेंटरमध्ये स्थालांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती ही डॉ. पवार यांनी यावेळी दिली.