शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:27 AM2018-10-22T00:27:54+5:302018-10-22T00:28:06+5:30

राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे.

Soon relief to farmers: Chandrakant Patil | शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

भिवंडी : राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे. या सर्व्हेनंतर दुष्काळात भरडलेल्या शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
तालुक्यातील चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा व भोईरगाव ते सावद नाका या रस्त्यांचे भूमिपुजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, दयानंद चोरघे, आर. सी. पाटील, देवेश पाटील आदी उपस्थित होते. भूमिपुजनानंतर पडघा येथे झालेल्या सभेत पाटील म्हणाले की, पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यादृष्टीने पाण्याचे स्त्रोत शोधले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारी यंत्रणांकडून पंचनामे झाल्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीन टप्पे असतात. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिले.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांना १६७ कोटींचा निधी देण्यात आला. चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा या रस्त्यासाठी २९ कोटी ५० लाख आणि भोईरगाव ते सावद नाका रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला. राज्यातही सर्वाधिक रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, राज्यात २२ हजार किलोमीटरचे रस्ते तयार होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. तालुक्यातील विकासकामांसाठी २३ हजार कोटी रु पयांचा निधी मंजूर केल्याबद्दल खासदार कपिल पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Soon relief to farmers: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.