रुक्मिणीबाई रुग्णालयाचे लवकरच नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:17+5:302021-06-24T04:27:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाची बुधवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. रुग्णालयाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाची बुधवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. रुग्णालयाचे लवकर नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
रुग्णालयाच्या पाहणीवेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर, अभियंता सुभाष पाटील, भालचंद्र नेमाडेहे देखील उपस्थित होते.
रुक्मिणीबाई रुग्णालयाचे नूतनीकरण करताना विविध सेक्शन, वार्ड आणि विभाग सुसज्ज करण्यात येणार आहेत. डोंबिवलीतील मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टिक कंपनीच्या माध्यमातून सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी या आरोग्यसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सुविधा रुक्मिणीबाई रुग्णालयात सुरू करण्यासाठी आयुक्तांनी जागेची पाहणी केली.
रुक्मिणीबाई रुग्णालयात वर्षभरात एक हजार ४०६ महिला प्रसूत होतात. त्यापैकी २२५ महिलांची शस्त्रक्रिया करून प्रसूती केली जाते. वसंत व्हॅली येथे मनपाची सुसज्ज अशी प्रसूतिगृहाची इमारत तयार आहे. परंतु, कोरोनाकाळात तेथे कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले होते. मात्र, रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूतीची सुविधा पूर्णपणे वसंत व्हॅली येथील प्रसूतिगृहात करण्यात येणार आहे. त्यामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयात अन्य आरोग्य सुविधा, कशा वाढीव स्वरूपात दिल्या जातील, यावर अधिक भर दिला जाणार आहे.
------------------------