अँड्राईड अॅपव्दारे ध्वनीची नोंद : विसर्जन काळातील ध्वनिप्रदूषणावर ठेवणार वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:57 AM2017-09-04T02:57:56+5:302017-09-04T02:58:23+5:30
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दरम्यान रुग्णालयांजवळ होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण कार्यकर्त्यांचे सुमारे २० पथके नजर ठेवणार आहेत.
ठाणे : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दरम्यान रुग्णालयांजवळ होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण कार्यकर्त्यांचे सुमारे २० पथके नजर ठेवणार आहेत. कोपरी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, कोर्टनाका, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी कार्यकर्ते वाद्य व बेंन्जोच्या आवाजांची नोंद घेऊन तक्रारी दाखल करणार आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी रुग्णालय परिसरात ध्वनिप्रदूषणास बंदी असतानाही मनमानी केली जात आहे. यास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. याआधी झालेल्या विसर्जनादरम्यान शहरात ठिकठिकाणच्या सुमारे ३२ रुग्णालय परिसरातील मिरवणुकीचे वाद्य बंद करण्यास भाग पाडले आहे.
दरम्यान, समज देऊन, प्रेमाने सांगूनही काही मंडळांनी मनमानी, कर्कष आवाजाचे ध्वनिप्रदूषण केल्यामुळे सुमारे ५० तक्रारी पोलिसात केल्याचे ठाणे मतदाता जागरण अभियानचे सचिव उन्मेश बागवे यांनी सांगितले.
आपले सण व उत्सव हे भारतीय सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, सण व उत्सव उत्साहात साजरे करण्याची परंपरा व त्यातून मिळणारी ऊर्जा व्यक्तिगत जीवनात उभारी देतात. त्यामुळेच सध्याच्या सततच्या पावसातदेखील गणेशोत्सवाच्या तसेच अन्य उत्साही वातावरणात कोणतीही बाधा आलेली नाही.
ठाणे मतदाता जागरण अभियान कोणत्याही धर्माच्या, सणांच्या किंवा उत्सव साजरे करण्याच्या विरोधात नाही. मात्र मर्यादांचे भान राखून जबाबदाºया पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. या भूमिकेस अनुसरून गणेशोत्सवाच्या या काळात गणपती विसर्जन करताना उत्साहात निघणाºया मिरवणुकांव्दारे ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अँड्रॉईड अॅपव्दारे ध्वनीची नोंद घेऊन ध्वनिप्रदूषण करणारी वाद्य बंद पाडली. त्यासाठी पोलिसांनी मोठे सहकार्य केल्याचे बागवे यांनी सांगितले.