परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली भाताची पिके झोपविली, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:45 PM2017-10-09T19:45:25+5:302017-10-09T19:45:41+5:30
परतीच्या पावसाने रोजच जोर धरला आहे. दररोज सायंकाळी पडणा-या जोरदार परतीच्या पावसामुळे भाताची शेतात उभी असलेली पिके जमीनीला टेकली आहे.
कल्याण : परतीच्या पावसाने रोजच जोर धरला आहे. दररोज सायंकाळी पडणा-या जोरदार परतीच्या पावसामुळे भाताची शेतात उभी असलेली पिके जमीनीला टेकली आहे. भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी केली आहे.
भातशेतीला चांगला पाऊस लागतो. यंदाच्या वर्षी चांगला दमदार पाऊस झाल्याने भातशेती करणारा शेतकरी सुखावला होता. चांगल्या पावसामुळे शेतक-यांनी चांगल्या प्रकारे भात पेरणी केली होती. अपेक्षेप्रमाणो शेतात भाताची पिके डुलू लागली. परतीच्या पावसाने अद्याप पाठ सोडलेली नाही. शेतात उभी असलेली पिके परतीच्या पावसाने झोपविली आहेत. त्यामुळे भातशेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. ठाणो जिल्ह्यात केवळ भातशेती केली जाते. या ठिकाणी एकच हंगामात पिके घेतली जातात. खरीपाचा हंगाम हा शेतक:यासाठी महत्वाचा असतो. एकमेव खरीप हंगामातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. कल्याण तालुक्यात जवळपास 5 हजार 900 हेक्टर शेतजमीनीवर भात शेती केली जाते. त्यातून दरवर्षी 2 हजार टन भात पिकवला जातो. ङिनी, तोरणा, कर्जत, जया, वाडा कोलम या भाताच्या जाती पिकविल्या जातात. पिकविलेल्या भातशेतीतून जो काही भात तयार होतो. तो राईस मिलमध्ये पॉलिश करुन त्यातून काही भात हा शेतकरी घरी खायला तर उर्वरीत भाताच्या विक्रीतून त्याला नगदी उत्पन्न मिळते. भातशेतीतून त्याची दोन्ही गरजा भागतात. परतीच्या पावसाने शेतकरीच अडचणीत आला आहे. शेतात उभे असलेले पिक खळ्य़ात झोडणीसाठी जाण्यापूर्वीच शेतात जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच्या हाती काही लागणार नाही. कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती घोडविंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी हा लहरी पावसामुळे अडचणीत येतो. त्यामुळे तो कजर्बाजारी होतो. त्याठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात. नुकतीच काही दिवसापूर्वी शेतकरी संपापश्चात शेतक-यांची समिती पाहणीसाठी ठाणो जिल्ह्यात आली होती. तेव्हा ठाणो जिल्ह्यातील शेतकरी किती अडचणीत आला तरी तो आत्महत्या करीत नाही असा मुद्दा शेतक-यांनी उपस्थित केला होता. मात्र ठाणो जिल्ह्यातील शेतक-यांना कजर्वाटपच झालेले नाही असा मुद्दा समोर आला होता. ओल्या दुष्काळामुळे भातशेती करणारा शेतकरी अडचणीत आल्याने तो आत्महत्या करु शकतो अशी भिती घोडविंदे यांनी व्यक्त केली आहे.