भारतीय तरुणांना अंतराळ संशोधनासाठी स्पेसनोव्हा करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 11:31 AM2021-09-01T11:31:02+5:302021-09-01T11:31:12+5:30

अंतराळात पृथ्वीजवळच्या कक्षेत अनेक उपग्रह असतात ज्याचे आकार मान प्रचंड मोठे असते.  या आकाराच्या वस्तूमुळे भविष्यात पृथ्वीला  धोका निर्माण होऊ  शकतो आणि म्हणूनच  शास्त्रज्ञ या सम्बन्धी अधिकाधिक जागतिक शोध घेत प्रयत्नशील असतात.

Spacenova will guide Indian youth in space research | भारतीय तरुणांना अंतराळ संशोधनासाठी स्पेसनोव्हा करणार मार्गदर्शन

भारतीय तरुणांना अंतराळ संशोधनासाठी स्पेसनोव्हा करणार मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टीम स्पेसोनोव्हा या संस्थेचा एक भाग म्हणून, परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणांनी अलीकडेच दोन नवीन लघुग्रह शोधले आहेत  आणि आता त्यांना त्या उपग्रहाना  नावे देण्याची संधी मिळाली आहे. अश्या अंतराळप्रेमी भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर मार्गदर्शन करण्याचे टीम स्पेसनोव्हाने ठरवले आहे.

 अंतराळात पृथ्वीजवळच्या कक्षेत अनेक उपग्रह  असतात ज्याचे आकार मान प्रचंड मोठे असते.  या आकाराच्या वस्तूमुळे भविष्यात पृथ्वीला  धोका निर्माण होऊ  शकतो आणि म्हणूनच  शास्त्रज्ञ या सम्बन्धी अधिकाधिक जागतिक शोध घेत प्रयत्नशील असतात. भारतातील स्पेसोनोवा या टीमने नुकतेच  दोन नवीन लघुग्रह शोधून काढले आहेत. इंटरनॅशनल अँस्ट्रोनॉमिकल सर्च कोलाबोरेशन (आयएएससी) हा नासाचा एक वैद्न्यानिक  उपक्रम आहे ज्याद्वारे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना सर्वसमावेशक आणि अद्ययन्वित  तसेच विश्वसनीय माहिती प्रदान केली जाते.
                  चार भारतीय  शास्त्रज्ञ,  शिवम कुमार सिंह, दिव्येश्वरी वानसडिया, रश्मी शेरोन आणि  आयुषी श्रीवास्तव सप्टेंबर २०२० पासून टीम  स्पेसोनोव्हा मध्ये  भाग म्हणून कार्यरत आहेत. पॅन-स्टार्सच्या प्रतिमांचे विश्लेषण करणे आणि  पृथ्वीच्या अंतराळ कक्षेतील वस्तू आणि लघुग्रहांचे मूळ निरीक्षण करणे हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे.
                  ह्या  जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत,  नासाच्या अंतराळ निरीक्षण अभ्यास विषयात  सातत्याने कार्यरत उपक्रम राबवले जातात. नुकतेच १६ जुलै २०२१ रोजी IASC द्वारे मायनर प्लॅनेट सेंटर (MPC) द्वारे दोन  लघुग्रहांचे  शोध यशस्वीरित्या  पुष्टीकृत केले गेले.  MPC मध्ये क्रमांकित केलेल्या लघुग्रहांना नाव देण्याचा मान त्यांच्या  वैज्ञानिक शोधकाना मिळतो.
           २१ वर्षीय शिवम कुमार सिंग, अंतराळ अधिवक्ता असून स्पेसोनोवाचे संस्थापक आणि संचालक आहेत जी एक अंतराळ शिक्षण आणि संशोधन आधारित संस्था आहे.  दिव्येश्वरी वानसडिया, रश्मी शेरॉन आणि  आयुषी श्रीवास्तव ह्या महिला खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान संवादक, स्पेसोनोवाचे सदस्य आहेत. या तरुण व्यावसायिकांनी 2025 पर्यंत सर्वांच्या आवाक्यात अंतराळ संशोधनाचा जागतिक समुदाय स्थापन करण्याचे आपले ध्येय असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले  आहे आणि जगभरातील मान्यवरांकडून याबद्दल त्यांचा  सन्मान आणि कौतुक होत आहे.

Web Title: Spacenova will guide Indian youth in space research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.