वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणे जिल्हा झळकवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेद्वारे विशेष प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 06:29 PM2021-11-15T18:29:44+5:302021-11-15T18:29:53+5:30
आगामी जिल्हा वार्षिक योजनेव्दारे जिल्ह्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
ठाणे : कृषी, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, शिक्षण, उर्जा, आरोग्य आदी विभागांच्या महत्वपूर्ण योजना आणि त्यासाठी उपलब्ध निधीच्या झाडाझडतीसह कोणताही निधी अखर्चित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी आणि आगामी जिल्हा आर्थिक विकास आराखडय़ाचे नियोजन आदींसाठी अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. त्यात वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणो जिल्हा झळकवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला.
येथील नियोजन सभागृहात यंदाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या विकास कामांसह 2क्22 -23 च्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी आराखडे अंतिम करून ते तातडीने देण्याचे आदेशही रानडे यानी या बैठकीत दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव अशी मदत केली जाते. त्याद्वारे ग्रामीण भागातील सुविधांचे बळकटीकरण, नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या मुद्यांवर आजच्या बैठकीतजोरदार चर्चा झाली. लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्याचे मार्गदर्शही यावेळी करण्यात आले.
आगामी जिल्हा वार्षिक योजनेव्दारे जिल्ह्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांची भूमिका महत्वाची असल्याचे निदर्शनात आणून दिले. पुढील वर्षांपासून वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणो जिल्ह्याचे नाव येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सहायक नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा नियोजनाच्या या बैठकीत विभागनिहाय योजना, अंदाजपत्रक, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता आदींच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विभागांना वर्ग केलेला निधी पुढील चार महिन्यात खर्च करण्यात यावा, त्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत परिपूर्ण मान्यतांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे देण्याच्या सूचना जाधव यांनी अधिका:यांना दिल्या. ग्रामीण भागातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही जाधव यांनी दिली.