ठाणे महापालिकेचे विशेष पथक महाडला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:24+5:302021-07-31T04:40:24+5:30

ठाणे : महाडमधील तळीये परिसरात मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पाठवलेल्या पथकामार्फत साफसफाईचे काम सुरू आहे. हे मदतकार्य गतिमान व्हावे यासाठी ...

Special team of Thane Municipal Corporation sent to Mahad | ठाणे महापालिकेचे विशेष पथक महाडला रवाना

ठाणे महापालिकेचे विशेष पथक महाडला रवाना

Next

ठाणे : महाडमधील तळीये परिसरात मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पाठवलेल्या पथकामार्फत साफसफाईचे काम सुरू आहे. हे मदतकार्य गतिमान व्हावे यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने विशेष पथक महाड येथे शुक्रवारी मदतकार्यासाठी रवाना झाले. या विशेष पथकासोबत पालकमंत्री आणि महापौर हेदेखील जात असून, शनिवारी सकाळी ९ वाजता महाड नगर परिषद येथे अधिकाऱ्यांसमवेत नियोजनाबाबत बैठक घेणार आहेत.

महापालिकेतर्फे महाडसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील यांची तर सहायक पथकप्रमुख कनिष्ठ अभियंता सुनील सजनानी यांची नेमणूक केली आहे. या पथकासोबत फायर ब्रिगेडचे एक वरिष्ठ अधिकारी व २९ फायरमन व तीन गाड्या, टीडीआरएफचे १३ जवान, फायलेरिया विभागाचे ३० कर्मचारी, मलनि:सारण विभागाचे ४० कर्मचारी व ८ गाड्या तसेच ५५ सफाई कामगार रवाना झाले असून, यामध्ये आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येथील काम वेगाने होईल, अशी आशा महापौरांनी व्यक्त करून, महाड व चिपळूण परिसरात साथरोग उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत स्थानिक नागरिकांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये जवळपास ५०० हून अधिक व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचारी व चिपळूण नगर परिषद यांच्या समन्वयाने सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत असून, फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे अग्निशमन दलाच्या वतीने प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून चिपळूण एसटी स्टॅण्ड, बाजारपेठ व इतर परिसराची साफसफाई करण्यात येत आहे.

Web Title: Special team of Thane Municipal Corporation sent to Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.