मीरा- भाईंदर मधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र; बुधवारी १६३ दिव्यांगांचे केले लसीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:44 PM2021-06-02T18:44:15+5:302021-06-02T18:44:27+5:30

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब लक्षात घेता दिव्यांगां साठी लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले होते .

Special Vaccination Center for the Handicapped at Mira-Bhayander; Vaccination of 163 persons with disabilities on Wednesday | मीरा- भाईंदर मधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र; बुधवारी १६३ दिव्यांगांचे केले लसीकरण 

मीरा- भाईंदर मधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र; बुधवारी १६३ दिव्यांगांचे केले लसीकरण 

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील १८ वर्षा वरील दिव्यांगांसाठी महापालिकेने भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील पालिका सभागृहात बुधवार २ जून पासून विशेष लसीकरण केंद्र सुरु केले आहे . आज बुधवारी पहिल्या दिवशी शहरातील १६३ दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.  

मीरा भाईंदर मध्ये  केंद्र शासना कडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम बारगळली आहे . लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळते . जेणे करून शहरातील दिव्यांगांना ह्या लसीकरण केंद्रांवर लस मिळणे अवघड झाले आहे . तासन तास रांगेत उभे राहणे त्यांना शक्य नाही . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब लक्षात घेता दिव्यांगां साठी लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले होते . त्या अनुषंगाने आता भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील महापालिकेच्या स्व . मोरेश्वर पाटील भवन येथील तळ मजल्यावर असलेल्या सभागृहात २ जून बुधवार पासून सकाळी १० ते दुपारी ४ ह्या वेळात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु केले आहे . दिव्यांगांना सदर केंद्रात थेट येऊन लस घेता येणार आहे . 

मीरा भाईंदर शहरातील दिव्यांगां साठीच हे लसीकरण केंद्र असून दिव्यंगत्वाचा शासकीय दाखल आदी पुरावे सोबत आणावे लागणार आहेत . बुधवारी आयुक्त ढोले , सभापती मीना कांगणे , लसीकरण अधिकारी डॉ . अंजली पाटील आदींच्या उपस्थितीत लसीकरण केंद्रास सुरवात झाली . पहिल्या दिवशी १६३ दिव्यांगांना लस देण्यात आली  

Web Title: Special Vaccination Center for the Handicapped at Mira-Bhayander; Vaccination of 163 persons with disabilities on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.