नांदिवली-पीअँडटी कॉलनीत जलवाहीनीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:55 PM2018-05-30T17:55:26+5:302018-05-30T17:56:27+5:30

कल्याण डोंबिवली - महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११२, ११३ व ११५ या प्रभागांमधील नागरिकांना पाणी मिळावे या नांदिवली विभागातील पाच जल वाहिन्यांना मंजुरी मिळाली. त्यानूसार महापालिकेने तात्काळ काम सुरु केले असून वेगाने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. अशा पद्धतीने काम झाल्यास महिनाभरात नांदिवली, नांदिवली गाव, पीअँडटी कॉलनी आदी भागातील सुमारे ७० हजार नागरिकांना पाणी मिळणार असून त्यांची दोन वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे.

The speed at the Nandivali-P & T colony | नांदिवली-पीअँडटी कॉलनीत जलवाहीनीच्या कामाला वेग

 ७० हजार रहिवाशांना मिळणार दिलासा

Next
ठळक मुद्दे महिनाभरात पाणी समस्या सुटण्याची शक्यता  ७० हजार रहिवाशांना मिळणार दिलासा

डोंबिवली: कल्याण डोंबिवली - महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११२, ११३ व ११५ या प्रभागांमधील नागरिकांना पाणी मिळावे या नांदिवली विभागातील पाच जल वाहिन्यांना मंजुरी मिळाली. त्यानूसार महापालिकेने तात्काळ काम सुरु केले असून वेगाने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. अशा पद्धतीने काम झाल्यास महिनाभरात नांदिवली, नांदिवली गाव, पीअँडटी कॉलनी आदी भागातील सुमारे ७० हजार नागरिकांना पाणी मिळणार असून त्यांची दोन वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे.
त्या कामाचे भूमीपूजन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे यांच्या उपस्थितीत २२ मे रोजी झाले होते. सध्या या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नगरसेविका रुपाली रवी म्हात्रे, प्रेमा प्रकाश म्हात्रे व अशालता बाबर यांच्या माध्यमातून टँकरद्वारे ३५ हून अधिक ठिकाणी दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. नांदिवली विभागातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता हे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये प्रभाग ११२ व ११३ करीता मानपाडा रस्ता ते गजानन चौक पासून ते नांदिवली टेकडीपर्यंत, प्रभाग ११२ करीता अन्नपूर्ण हॉटेल ते समर्थ नगर पर्यंत, प्रभाग ११५ करीता टेम्पो नाका ते गार्डियन स्कुल पासून बामणदेव मंदिर पर्यंत, प्रभाग ११२ व ११३ करीता अन्नपूर्णा हॉटेल ते हनुमान मंदिर पासून गणराज कॉम्प्लेक्स पर्यंत, प्रभाग ११३ व ११५ करीता पिंपळेश्वर मंदिर ते मानपाडा रस्ता पासून इंप्रेस मॉल पर्यंत अशा एकूण पाच जलवाहिन्या मंजूर करण्यात आल्या असून सर्व ठिकाणचे काम वेगाने सुरु आहे. एकूण १ कोटी १२ लक्ष ६३ हजार रक्कमेच्या जलवाहिन्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी ८ इंच आणि ६ इंचाच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. जर महापालिकेच्या कामामध्ये साधनसामग्रीमुळे अडथळा येत असेल तर स्वत:चा जेसीबी, मजूर लावण्याचीही तयारी रवी म्हात्रे यांनी दर्शवली आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत कामाच्या वेगामध्ये अडथळा नसावा, यासाठी ते स्वत: लक्ष घालत असल्याचे सांगण्यात आले. या कामासंदर्भात आमदार सुभाष भोईर हे सातत्याने आढावा घेत असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांचेही या ठिकाणी लक्ष असल्याचे म्हात्रे म्हणाले.

Web Title: The speed at the Nandivali-P & T colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.