डोंबिवलीतील खड्डे भरण्याच्या कामाला वेग, रातोरात भरले जातायत खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:09 AM2017-10-26T07:09:30+5:302017-10-26T07:09:42+5:30
डोंबिवली- शहरातील खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने कंबर कसली आहे, रातोरात ते काम सुरू केले आहे
डोंबिवली- शहरातील खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने कंबर कसली आहे, रातोरात ते काम सुरू केले आहे. त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप, शिवसेना, मनसेचे नगरसेवक रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याच्या कामात लक्ष घालत आहेत. गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीत येणार असून ते खड्यांवर सडकून टीका करतील याची महापालिका प्रशासनाला माहिती असून सत्ताधार्यांनीही तीच धडकी घेत रातोरात खड्डे बुझवण्यासाठी कंबर कसली असल्याचा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. भाजपने मात्र खड्डे बुझवण्याचे काम गेल्याच आठवड्यात सुरू होणार होते, मात्र पावसाळा लांबल्याने ते काम आता सुरू झाले आहे.गेल्या आठवड्यात खड्डे साफ केले होते, आता शास्त्रोक्त पद्धतीने भरले जात आहेत, असेही सांगण्यात आले. यात कोणीही श्रेय घेण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण भाजप तर्फे देण्यात आले.