अभ्यास दौ-यासाठी प्रायोजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:53 AM2018-02-22T00:53:19+5:302018-02-22T00:53:19+5:30

महापालिकेचे सभाशास्त्र, अंदाजपत्रक, घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या विषयाचे प्रशिक्षण ठाण्यात घेणे शक्य नसल्याने महापालिकेचे नगरसेवक गुरुवारी राजस्थानच्या टूरला विमानाने रवाना होणार आहेत.

Sponsor for Study Tours | अभ्यास दौ-यासाठी प्रायोजक

अभ्यास दौ-यासाठी प्रायोजक

Next

ठाणे : महापालिकेचे सभाशास्त्र, अंदाजपत्रक, घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या विषयाचे प्रशिक्षण ठाण्यात घेणे शक्य नसल्याने महापालिकेचे नगरसेवक गुरुवारी राजस्थानच्या टूरला विमानाने रवाना होणार आहेत. या टूरसाठी १२ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षित धरला आहे. परंतु, विमानाची तिकीटे महागडी असल्याने त्यातील अर्धा खर्च एका प्रायोजकाने उचलल्याची माहिती समोर आली आहे. परंतु,हा प्रायोजक कोण हे मात्र समजू शकलेले नाही. दुसरीकडे काही नगरसेवकांनी दौºयासाठी लगीनघाई करून नवीन कपडे घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
चार दिवसांचे हे प्रशिक्षण असले तरी यानिमित्ताने नगरसेवकांची राजस्थानची सहल होणार असल्याची चर्चा शहरात आहे. नवनिर्वाचीत नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात येते. मात्र, सार्वत्रिक निवडणूक होऊन वर्ष उलटले तरी प्रशिक्षण झाले नव्हते. मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्यामार्फत ते आयोजित करण्यात येते. अखेर वर्षभरानंतर या संस्थेला महापालिकेतील नगरसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्र मासाठी मुहूर्त सापडला असून त्यांनी त्यासाठी राजस्थान येथील जयपूरची निवड केली आहे. त्यानुसार २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत हे प्रशिक्षण पार पडणार आहे. यासाठी महापालिकेने नगरसेवकांकरीता विमान प्रवास, निवास व्यवस्था, चहा-नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण अशी सोय केली आहे. त्यासाठी सुमारे १२ लाख रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये विमान तिकिट येऊन जाऊन साधारपणे ५ हजार आणि प्रत्येक दिवसाचे २ हजार असा खर्च धरला आहे. तीन दिवस वास्तव्य असल्याने साधारणपणे प्रत्येक नगरसेवकावर १२ हजारांचा खर्च होण्याची शक्यता आहे. असे असले तरी विमान प्रवासासाठी केवळ पाच हजार खर्च अपेक्षित धरला होता. त्यामुळे त्यावरील खर्चाची जबाबदारी आता एका प्रायोजकाने उचलली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने तर स्वत:ला कपडे घेण्याबरोबरच आपल्या गोटातील नगरसेवकांनादेखील नवीन कपडे घेण्यासाठी बुधवारी लगीनघाई चालविल्याचे दिसले.

Web Title: Sponsor for Study Tours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.