बदलापूर येथे रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:13+5:302021-07-05T04:25:13+5:30

बदलापुरात रविवारी रोटरी क्लब ऑफ बदलापूर, रोटरॅक्ट क्लब ऑफ बदलापूर, रोटरॅक्ट क्लब बदलापूर इंडस्ट्रियल एरिया, रोटरॅक्ट क्लब ऑफ भारत ...

Spontaneous response to blood donation at Badlapur | बदलापूर येथे रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

बदलापूर येथे रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

बदलापुरात रविवारी रोटरी क्लब ऑफ बदलापूर, रोटरॅक्ट क्लब ऑफ बदलापूर, रोटरॅक्ट क्लब बदलापूर इंडस्ट्रियल एरिया, रोटरॅक्ट क्लब ऑफ भारत कॉलेज, रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरिया, रोटरी क्लब बदलापूर सिटी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजिले होते. सकाळच्या सत्रात अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक व रोटरी क्लब ऑफ बदलापूरचे चार्टर्ड प्रेसिडेंट हेमंत आपटे, रोटरी क्लब ऑफ बदलापूरचे प्रसिडेंट गणराज जैन, सेक्रेटरी विनायक पवार, रोटरॅक्ट क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष राहूल बर्वे, रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाचे प्रेसिडेंट राजीव दिवाण, रोटरी क्लब बदलापूर सिटीचे प्रेसिडेंट मनोज वैद्य, रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाचे सेक्रेटरी रामू गडकर, रोटरॅक्ट क्लब बदलापूरला इंडस्ट्रियल एरियाचे प्रवीण चौधरी, रोटरॅक्ट क्लब भारत कॉलेज अध्यक्ष सुरभी मिश्रा अशा क्लबच्या सर्व सभासदांनी सहभाग घेतला.

Web Title: Spontaneous response to blood donation at Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.