भिवंडीत लॉकडाऊनला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:39 AM2021-04-11T04:39:09+5:302021-04-11T04:39:09+5:30
भिवंडी : शहरात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी शनिवारी शुकशुकाट दिसला. ...
भिवंडी : शहरात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी शनिवारी शुकशुकाट दिसला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, तर नागरिकांनी घराबाहेर न पडता या वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दिला.
भिवंडी शहरातदेखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मनपा प्रशासनासह वीकेंड लॉकडाऊनसाठी पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील धामणकरनाका, जकातनाका, वंजारपट्टीनाका, अंजुरफाटा, छ. शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, मंडई या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता, तर शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींकडून ओळखपत्राची खात्री करूनच त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्याची मुभा देण्यात येत होती.
अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी वगळता अती आवश्यक कामासाठी नागरिकांनी शहरात प्रवेश करावा, अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.
===Photopath===
100421\img-20210410-wa0010.jpg
===Caption===
भिवंडीत विकेंड लॉकडाऊनला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद ; पोलोसांचाही चोख बंदोबस्त