लोकमत अॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:48 AM2018-08-18T02:48:26+5:302018-08-18T02:48:42+5:30
वाचकांच्या अभिरूची लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समूह नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. केवळ वाचकच नव्हे सामाजिक बांधिलकी म्हणूूनही लोकमतने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे.
ठाणे - वाचकांच्या अभिरूची लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समूह नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. केवळ वाचकच नव्हे सामाजिक बांधिलकी म्हणूूनही लोकमतने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. मग ती ठाणे शहरांतील नागरी समस्या निवारणासह तलाव संवर्धनाचा प्रयत्न असो वा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ठाणे आयकॉन पुरस्कार गौरव. अशाच प्रकारे आता नव्या पिढीची लाईफस्टाईल बघून आजच्या डिलिटल युगात आॅनलाईन व्यवहारांना प्राधान्य देऊन डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी ही लोकमतने कायम पुढाकार घेतला आहे.
खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा. त्यासाठी ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास ठाणे शहरातील तलावपाळी, कचराळी तलाव, उपवन लेक, मानपाडा आणि वागळे इस्टेट येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ शिका आॅनलाईन शॉपिंग सहजपणे, हा फंडा घेऊन आलेल्या उपक्रमास ठाणे शहरात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात पूर्वीपासून ज्यांच्याकडे अॅप आहे, अशांवरही बक्षिसांची बरसात केलेली आहे. तसेच खेळात सहभागी होऊन तीन हजार रुपये किमतीचे गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी गर्दी केलीे. अनेकांनी स्मार्ट फोनवर ‘अॅमेझॉन अॅप’ डाउनलोड केले आहे. तुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करून समान मासिक हप्त्यांमध्ये तुमची आॅर्डर पे करू शकता. त्यात विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादनांसाठी एकाच जागी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले आहेत. यासाठी ग्राहकांना ‘अॅप’ डाउनलोड करण्यासाठी निवेदकांनी हसत-खेळत आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले.
कॅश आॅन डिलिव्हरी : तुमची आॅर्डर द्या आणि आॅर्डर आल्यावर पैसे द्या. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. ‘कॅश आॅन डिलिव्हरी’साठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता. लोकांच्या मनातील शंका इथे दूर होऊ शकतात. ‘अॅमेझॉन अॅप’ वापरायला मी सुरुवात कशी करावी, योग्य उत्पादन निवडले आहे हे मला कसे कळेल, योग्य उत्पादन सापडल्यानंतर मी पैसे कसे द्यायचे, मला उत्पादन परत करायचे असल्यास ते कसे परत करायचे, अशा विविध प्रश्नांचे समाधान इथे केले जात आहे. त्यामुळे ग्राहक समाधानी होत आहेत.
‘क्यू-आर कोड’ स्कॅन करा आणि रु. ३००० चे गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधी मिळवा !
बक्षीस कूपन विजेते : मयुर पाटील, शुभम दुबे, अनुजकुमार गौड, संजय कुमार, आत्माराम पाटील, नमिता सार्वेडकर, रत्नप्रभा परब, चंदन सिंग, धीरज ठाकरे, अनिश कोटकर