रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल १०४ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:14+5:302021-07-03T04:25:14+5:30
अंबरनाथ : रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि ‘लोकमत’ यांच्यातर्फे ‘रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ...
अंबरनाथ : रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि ‘लोकमत’ यांच्यातर्फे ‘रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये १०४ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अंबरनाथ शहराशी निगडित असलेले सर्व रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष गुणवंत भंगाळे, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ एस.टी.चे शिवकुमार मुदलीयर, रोटरी क्लब अंबरनाथ नॉर्थचे प्रकाश कोठारी, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ वेस्टचे कौशल पंखानिया, रोटरी क्लब ऑफ रॉयल अंबरनाथचे निखिल चौधरी, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथचे विशाल राठोड, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ ईस्टचे पदाधिकारी, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे प्रफुल्ल वारणकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीचे प्रतीक वारादे, इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या काजल खातवाणी, इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्सच्या स्नेहल केलूस्कर, ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन, अंबरनाथ मेडिकल असोसिएशन, स्पंदन फाउंडेशन, अंबर भरारी आणि तालुका पत्रकार परिषद या सर्व संघटना या रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या होत्या. या शिबिराचे नियोजन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीचे डॉ. जयेश वराडे यांनी केले.
अंबरनाथ रोटरी क्लबच्या सभागृहात हे रक्तदान शिबिर पार पडले. सकाळी १० पासून दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ११० रक्तदाते या शिबिरासाठी उपस्थित होते. त्यांतील १०४ रक्तदात्यांना रक्तदान करण्याची संधी मिळाली; तर उर्वरित सहाजणांना वैद्यकीय चाचणीमध्ये वगळण्यात आले.