शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, २२०० उमेदवारांना नियुक्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:29 AM2018-10-01T04:29:23+5:302018-10-01T04:29:45+5:30
२२०० उमेदवारांना नियुक्तीपत्र : बालाजी किणीकरांनी केले कौतुक
बदलापूर : शिवसेना दत्तवाडी शाखा व नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यावतीने बदलापूरमध्ये शनिवारी रोजगार मेळावा झाला. या मेळाव्याला तरु णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात नावनोंदणी केलेल्या २५०० पैकी २२५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी २२०० उमेदवारांना विविध कंपन्या, बँका आदींकडून नोकरीसाठी आॅन द स्पॉट आॅफर लेटर देण्यात आले अशी माहिती आयोजक शैलेश वडनेरे यांनी दिली. अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यांमुळे उमेदवार आणि सुशिक्षित बेरोजगारांना बदलापूरमध्येच नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी वडनेरे यांचे कौतुक केले.
शनिवारी ज्ञानेशवर सभागृह, मराठी शाळा, गांधी चौक बदलापूर पूर्व येथे हा रोजगार मेळावा झाला. या रोजगार मेळाव्यात पाचवी, दहावी, बारावी ते पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असणाºया तरु णतरु णींना विविध नामांकित कंपन्या, लॉजिस्टिक सेंटर, बँका,आयटी, फायनान्स, रिटेल, केपीओ, बीपीओ, एयरपोर्ट, हॉस्पिटॅलिटी, विमा आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली. आयसीआयसीआय, एचडीएफसी आदींसह अंबरनाथ,भिवंडी येथील अनेक नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. संबंधित कंपन्यांच्या अधिकाºयांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अंबरनाथ, बदलापूर व मुरबाड परिसरातील तरु णतरूणींचा त्यामध्ये सहभाग होता.
या रोजगार मेळाव्यात पाचवीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाºया तरु णतरु णींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे वडनेरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, बदलापूरच्या नगराध्यक्षा विजया राऊत, नगरसेविका शीतल राऊत, नगरसेवक तुषार बेंबळकर आदी उपस्थित होते.