विकेंड लॉकडाऊनला ठाण्यात रविवारीही उत्स्फुुर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 10:42 PM2021-04-11T22:42:21+5:302021-04-11T22:46:23+5:30

राज्य शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ठाणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रविवार असूनही मार्केट आणि रस्तेही ओस पडले होते. ठाणे शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असले तरी एसटी, टीएमटी, रिक्षा सेवा सुरु होती. प्रवासीच नसल्यामुळे टीएमटीच्या ५० टक्के फेºया रविवारी कमी केल्या होत्या. मात्र, या वाहतूकीवर कोणताही परिणाम जाणवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Spontaneous response to weekend lockdown in Thane on Sunday | विकेंड लॉकडाऊनला ठाण्यात रविवारीही उत्स्फुुर्त प्रतिसाद

पोलिसांसह राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त

Next
ठळक मुद्देदुकाने कडकडीत बंद पोलिसांसह राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ठाणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रविवार असूनही मार्केट आणि रस्तेही ओस पडले होते. काही ठिकाणी मेडिकलच्या आडून भलत्याच सामानांची विक्री सुरु असल्यामुळे त्याठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘बे्रक द चेन’ अंतर्गत ठाण्यातही शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने तसेच आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवरही पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. पोलिसांकडून कारवाई होण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तावर नसतांनाही नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याचे पहायला मिळत आहे. काही तुरळक ठिकाणी मात्र अनावश्यकपणे नागरिक रस्त्यावर आल्याचे पहायला मिळाले. जांभळी नाका, टेंभी नाका त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ, इंदिरानगर आणि कळवा मार्केट याठिकाणी एरव्ही गर्दी पहायला मिळते. रविवारी मात्र, याठिकाणी लॉकडाऊनचे पालन झाल्याचे पहायला मिळाले. दुकाने पूर्णपणे बंद असल्यामुळे मार्केट परिसरात शुकशुकाट होता. स्टेशन रोड परिसरातही मुख्य भाजी मंडई, धान्य मार्केट बंद होते. अशीच परिस्थिती शास्त्रीनगर, वर्तकनगर आणि वसंतविहार या भागात होती. पोलिसांनीही बॅरीकेट्स लावून अनेक भागातील रस्ते बंद केले होते. नेहमी गजबजलेला मासुंदा तलाव, चिंतामणी चौक, मानपाडा आणि हिरानंदानी इस्टेट या परिसरातही शांततेचे वातावरण होते.
* विनाकारण फिरणाºयांची बंदोबस्तावरील पोलिसांकडून कापूरबावडी नाका, माजीवडा नाका, नितीन कंपनी, तीन हात नाका आणि कळवा नाका आदी भागांमध्ये चौकशी केली जात होती. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाºयांना मात्र समज देऊन पुन्हा घरी पाठविले जात होते.
* शनिवार आणि रविवारी केवळ औषध विक्रीची दुकाने सुरु असल्यामुळे कासारवडवली भागात एका मेडिकलच्या दुकानात चक्क इतर सामानाची विक्री केली जात असल्याचे आढळले. त्यामुळे या विक्रेत्याला कलम १८८ अंतर्गत नोटीस बजावल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
* वाहतूक मात्र सुरु
ठाणे शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असले तरी एसटी, टीएमटी, रिक्षा सेवा सुरु होती. प्रवासीच नसल्यामुळे टीएमटीच्या ५० टक्के फेºया रविवारी कमी केल्या होत्या. मात्र, या वाहतूकीवर कोणताही परिणाम जाणवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दूध, भाजी, मांसाहारी पदार्थांच्या विक्रीची दुकानेही सकाळी आणि सायंकाळी काही काळ सुरु होती.

 

 

Web Title: Spontaneous response to weekend lockdown in Thane on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.