नशामुक्तीसाठी मुंब्रा येथे क्रीडास्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:17+5:302021-07-12T04:25:17+5:30

मुंब्रा : नशामुक्त मुंब्रा शहरासाठी संघर्ष महिला संघाने व्यापक प्रमाणावर अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत जनजागृती, तसेच इतर ...

Sports competition at Mumbra for de-addiction | नशामुक्तीसाठी मुंब्रा येथे क्रीडास्पर्धा

नशामुक्तीसाठी मुंब्रा येथे क्रीडास्पर्धा

Next

मुंब्रा : नशामुक्त मुंब्रा शहरासाठी संघर्ष महिला संघाने व्यापक प्रमाणावर अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत जनजागृती, तसेच इतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तरुणांनी नशेपासून दूर राहावे, यासाठी त्यांचा दिनक्रम व्यस्त राहावा, यासाठी कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन यांसारख्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर, जे नशेच्या आहारी गेले आहेत, त्यांनी त्यापासून परावृत्त व्हावे, यासाठी समुपदेशन शिबिरेही घेतली जाणार आहेत. याचप्रमाणे, नशामुक्ती केंद्रात उपचार घेण्याची ज्यांची अर्थिक परिस्थिती नाही, अशांचा नशामुक्ती केंद्रातील ५० टक्के खर्च संघातर्फे करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची देवाण-घेवाण होत असेल, अशा ठिकाणांची व संबंधित व्यक्तींची माहिती ०२२-२५४६८५८७ या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड आणि शादाब यांनी केले आहे.

--------------

Web Title: Sports competition at Mumbra for de-addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.