ठाणे जिल्ह्यात जि.प.शाळांच्या क्रीडा स्पर्धा रंगतदार; बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
By सुरेश लोखंडे | Published: December 6, 2022 06:14 PM2022-12-06T18:14:11+5:302022-12-06T18:16:04+5:30
दिवसभरांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत मुलांची लंगडी या स्पर्धेत शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
ठाणे - दहिसर केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव बाळे येथील पोहू बाळ पाटील हायस्कूलमध्ये पार पडला. या क्रीडा महोत्सवात परिसरातील ठाणे जिल्हा परिषदेच्या १४ शाळांनी सहभाग घेतला. दिवसभर अटीतटीच्या झालेल्या खेळांच्या सामन्यांमध्ये बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन, मुलांची लंगडी यामध्ये शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या केंद्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील व १४ गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील,केंद्रप्रमुख कृष्णाकांत खेडेकर यांच्या उपस्थित पार पडले. दिवसभरांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत मुलांची लंगडी या स्पर्धेत शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यशामुळे या शाळेच्या संघाला पुढे कल्याण तालुकास्तरीय स्पधेर्साठी खेळण्याची संधी मिळाली आहे. ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये वीर संतोष पावशे व मुलींमध्ये आरोही शिवदास पावशे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.त्यामुळे परिसरातील पालक व ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक पंडित गायकवाड, शर्मिला गायकवाड यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
बक्षीस वितरण समारंभासाठी बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश पाटील व १४ गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते मुलांना प्रथम द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी व प्रमाणपत्र, बक्षिस आदी देऊन प्रोत्साहीत करण्यात आले. यावेळी महेश पाटील यांच्या वतीने या १४ गावातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन पेन्सिल, शालेय स्टेशनरी देणार असल्याचे घोषित करण्यात आले