तलवारबाजीतील पारंगत ठाण्यातील पुजा आवारेला बेस्ट एनसीसी कॅडेटसह स्पोटर््सवुमेन आवार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:02 PM2018-02-16T16:02:56+5:302018-02-16T16:07:11+5:30
पुजाच्या परिश्रमाची दखल घेऊन तिची ‘बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्डसाठी निवड केली. या सर्वोत्कृष्ट आवार्डसह ‘बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड’ ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांनी देऊन पुजाला सन्मानित केले
ठाणे : ईटीव्हीवरील ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मराठी मालिकेतील दांडपट्टा व तलवारबाजीचे खास प्रात्याक्षिक दाखवून सर्वाची वाहवाह मिळवणारी येथील पुजा दिपक आवारे या विद्यार्थीनीने एनसीसीचा बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्ड व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड प्राप्त करून आपल्या खेळाडू वृत्तीची झलक दाखवून दिली आहे.
येथील प्रसिध्द ज्ञानसाधना महाविद्यालयात एफवायबीएला असलेल्या पुजाने अवघ्या १९ वर्षाच्या कालावधीत राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या ‘तलवारबाजीसह दांडपट्टा’ स्पर्धेत नावलौकिक मिळवले आहे. या महाविद्यालयीन शिक्षणा दरम्यान एनसीसीत विविध स्पर्धांचे पारितोषीक पटकवले आहेत. यामुळे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एनसीसी शाखेच्या लेफ्टनंट कर्नल राधीका मुखर्जी यांनी पुजाच्या परिश्रमाची दखल घेऊन तिची ‘बेस्ट एनसीसी कॅडेट आवार्डसाठी निवड केली. या सर्वोत्कृष्ट आवार्डसह ‘बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्ड’ ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांनी देऊन पुजाला सन्मानित केले.
महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी समारंभपूर्वक पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता. वर्तकनगरमध्ये लहानश्या घरात राहणाºया या पुजाने सांगली येथे पार पडलेल्या राज्य शासनाच्या स्टेटलेव्हल कॅम्पीएनशीपमध्ये तलवारबाजी दांडपट्टा स्पर्धेत सिलवर मेडल प्राप्त केले आहे. भंडारा येथील तलवारबाजी दांडपट्टा स्पर्धेतही तिने सिलवर मेडल पटकवले आहे. एनसीसी, एनएसएस आणि सिव्हील डिफेन्स शाखेत कार्यरत असलेल्या पुजाने विविधि स्पर्धांमध्ये बाजी मारून आतापर्यंत तिने चार गोल्ड मेडल, चार सिलवर आणि सहा ब्राऊन मेडलची कमाई केल्याचे पुजाचे वडील दिपक आवारे यांनी सांगितले आहे. त्यात आता बेस्ट एनसीसी कॅडेट व बेस्ट स्पोर्ट्सवुमेन आॅफ दी इअर आवार्डची भर पडली आहे. विद्यार्थीनीवयात पुजाने आतापर्यंत केलेल्या कार्याचे कौतूक करीत तिचा सत्कार आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील शुक्रवारी करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
................
फोटो - १६ठाणे एनसीसी आवार्ड