अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या वसाहतींत जंतूनाशक फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:16+5:302021-07-22T04:25:16+5:30
कल्याण : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केडीएमसीच्या अनेक सखल भागांत पाणी साचले होते. तेथील पाण्याचा निचरा झाल्यावर, ...
कल्याण : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केडीएमसीच्या अनेक सखल भागांत पाणी साचले होते. तेथील पाण्याचा निचरा झाल्यावर, तेथे साथरोग टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी, डासअळी नाशक, दुर्गंधीनाशक फवारणी करावी, असे आदेश मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बल्याणी परिसरात रस्ता खचल्याने पावसाचे पाणी परिसरातील चाळींमध्ये शिरले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार, तेथे प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी फवारणी केली आहे. कल्याण पूर्वेतील पिसवली, तुकाराम चौक, विको नाका, समतानगर, देशमुख होम्स, दावडी रोड, गोळवळी परिसरातही पाणी साचले होते. कांचन गाव, दिनेशनगर या चाळीमध्ये पाणी शिरले होते. त्याचबरोबर, डोंबिवलीतील नांदिवली, समर्थनगर, भोपरनाला, गांधीनगर परिसरात साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑइलची फवारणी केली आहे. त्यासाठी प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी पुढाकार घेतला आहे. उर्वरित भागांतही पावसाच्या पाण्याचा निचरा होताच फवारणी करण्यात येणार असल्याचे प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी सांगितले.
फवारणीसाठी चार जीप, धुरावणीचे ३१ हॅण्ड पंप, १० मल्टिजेट ट्रॅक्टर, १२२ जंतुनाशक फवारणीचे हॅण्ड पंप यांचा वापर करून, फवारणी केली जात आहे. पावसाचे पाणी साचलेल्या भागातून पावसाळी संसर्गजन्य साथीचे आजार फसरू शकतात, त्यासाठी ही खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.
--------------------