SSC Result: ठाणे जिल्हाचा दहावीचा निकाल ९९.२८ टक्के; मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:58 PM2021-07-16T17:58:14+5:302021-07-16T21:15:31+5:30
SSC result of Thane district: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल तयार करण्यात आलेला आहे.
ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल तयार करण्यात आलेला आहे. जाहीर झालेल्या या निकालात ठाणे जिल्ह्याचा ९९.२८ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी लतिका कावडे यांनी लोकमतला सांगितले. (SSC result of Thane district is 99.28 percent; The highest results of the last several years)
जिल्ह्यातील या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ९१ विद्यार्थी परिक्षार्थी होते. त्यापैकी एक लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ६६ हजार ८४५ मुले तर ५७ हजार २४६ मुलीं प्रविष्ट होत्या. जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी परिक्षार्थी होते. यामध्ये मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातील ९९.७१ टक्के विद्यार्थी सर्वाधिक उत्तीर्ण झाले आहेत.
मागील दहा वर्षातील आकडेवारी खालील प्रमाणे...
- 2011 - 88.39
- 2012 - 88.87
- 2013. - 88.90
- 2014 - 89.75
- 2015. - 93.01
- 2016. - 91.42
- 2017. - 90.59
- 2018. - 90. 51
- 2019. - 78.55
- 2020. - 96.61
- 2021 - 99.28