मुरबाडच्या काही ग्रामीण भागात एसटी बसफेऱ्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:40+5:302021-07-31T04:39:40+5:30

टोकावडे : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या कोरोना काळापासून बंद आहेत. अनेक गावांतील नागरिक बसफेऱ्या सुरू कराव्यात, यासाठी मुरबाड ...

ST buses are closed in some rural areas of Murbad | मुरबाडच्या काही ग्रामीण भागात एसटी बसफेऱ्या बंदच

मुरबाडच्या काही ग्रामीण भागात एसटी बसफेऱ्या बंदच

Next

टोकावडे : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या कोरोना काळापासून बंद आहेत. अनेक गावांतील नागरिक बसफेऱ्या सुरू कराव्यात, यासाठी मुरबाड आगारात मागणी करीत आहेत. मात्र, या मागणीनंतर आश्वासनापलीकडे काहीच हाती लागत नाही. त्यामुळे मुरबाड आगारातील कारभारावर ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, यामुळे कामधंद्यावर परिणाम हाेत आहे.

अनेक जण तालुक्यातील मुरबाड औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जातात. तर तालुक्यातील भाजीपाला व्यापारीही शहरात भाजीपाला घेऊन जातात. त्यासाठी ग्रामीण भागातील बस हा महत्त्वाचा पर्याय ठरतो. मात्र, तालुक्यातील असोसे, करवेळे, विढे, ठुने-पाडाळे, कोलठण या भागातील नागरिक ग्रामीण फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करीत आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुरबाड आगाराला निवेदन दिले. मात्र या मागणीला अद्याप यश आलेले नाही.

Web Title: ST buses are closed in some rural areas of Murbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.