एसटी संप : अवैध वाहतूकदारांकडून लूट; ५५० फेऱ्या रद्द, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:35 PM2018-06-08T23:35:19+5:302018-06-08T23:35:19+5:30

एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली.

 ST commissions: looted by illegal transporters; 550 trips canceled, students' recruitment | एसटी संप : अवैध वाहतूकदारांकडून लूट; ५५० फेऱ्या रद्द, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

एसटी संप : अवैध वाहतूकदारांकडून लूट; ५५० फेऱ्या रद्द, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

Next

ठाणे : एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली. जिल्ह्यातील एसटीच्या आठ आगारांतून रोज एसटीच्या एक हजार सहा फेºया होतात. मात्र, या संपात सुमारे ४८ टक्के वाहक व चालकांनी सक्रिय सहभाग घेतल्याने संध्याकाळपर्यंत ५५० फेºया रद्द कराव्या लागल्याचे एसटीचे ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले
पुढील सहा दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे वेळीच घर गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना संपाचा फटका बसला. त्यांच्या या गरजेचा गैरफायदा घेऊन अवैध वाहतूक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फोफावली. नेहमीपेक्षा जास्त भाडे आकारून या अवैध वाहतूकदारांनी प्रवाशांची चांगलीच लूट केली. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही.
सकाळी या संपास न जुमानता काही वाहक, चालकांनी बस नेहमीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपात सहभागी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्यामुळे भिवंडीसह अन्य ठिकाणी आपापसात बाचाबाची झाली. तरीदेखील एक हजार १४४ बसफेºयांपैकी संपात सहभागी नसलेल्या काही वाहक, चालकांनी एकत्र येऊन सुमारे ५९४ बसफेºया पूर्ण केल्या. सुमारे ५२ टक्के वाहक, चालकांनी संपात सहभाग घेतला नाही. तर, ४८ टक्के कर्मचाºयांच्या सक्रिय सहभागामुळे एसटीचे दिवसभराच्या कालावधीत अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
जिल्ह्यातील कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, वाडा या बस आगारांत काही प्रवासी वाहतूक सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत सुरळीत होती. तर शहापूर, भिवंडी, ठाणे १, ठाणे २ आदी चार बस आगारांतील बस दिवसभरासाठी बंद होत्या. मात्र, काही कालावधीनंतर त्या आगारातही काही बसफेºया पूर्ववत करण्यात आल्या. जिल्हाभरातील आठ बस आगारांपैकी ठाणे १ येथे ११८ फेºया व ठाणे २ वरील १०४ प्रवासी फेºया रद्द कराव्या लागल्या.
याशिवाय, भिवंडी आगारात सर्वाधिक १८२ बसफेºया रद्द केल्यामुळे केवळ ३४ फेºया दुपारनंतर पूर्ण केल्या. याखालोखाल शहापूरला ८९ फेºया, कल्याणला केवळ चार फेºया, विठ्ठलवाडीला ४३, मुरबाडला चार फेºया आणि वाडा येथील बस आगारातील सहा बसफेºया रद्द कराव्या लागल्या.शहापुरात आगर व्यवस्थापक पी.एम. शिंदे यांनी प्रवाशांची काळजी घेतली.
भिवंडी आगारातील महाराष्ट्र कामगार संघटनेचा सदस्य जी.बी. इंगळे व व्ही.जी. आव्हाड यांच्यामध्ये बस आगाराबाहेर काढण्यावरून शिवीगाळ व बाचाबाची झाल्याने इंगळे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत नोंद घेऊन दोघांनाही समज दिली. या संपाचा फायदा घेऊन शहरातील काही रिक्षाचालकांनी ठाणे व कल्याण येथे जाण्यासाठी प्रवाशांची वाढीव भाडे मागून लूट केली. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title:  ST commissions: looted by illegal transporters; 550 trips canceled, students' recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.