एसटी महामंडळ शाळेच्या दारी! ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात मोफत एसटी बस पासचे वितरण
By अजित मांडके | Published: June 21, 2024 05:33 PM2024-06-21T17:33:51+5:302024-06-21T17:35:00+5:30
गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे.
ठाणे : राज्य शासनाने मुलींना राजमाता अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत एस टी मासिक बस पास मोफत दिला जात असून, जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीनीची गैरसोय होऊ नये म्हणून, ठाणे एस टी विभागातर्फे एस टी कर्मचारी शाळेत भेटी देत आहेत. गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे.
शासनाच्या अनेक योजना " आपल्या दारीच्या " नावाने सुरू आहेत. आता एसटी महामंडळ सुध्दा हा उपक्रम राबवत आहे. विद्यार्थिनींना एस टी चा मोफत मासिक पास अणि विद्यार्थ्यांना ६७ टक्के सवलतीचा पास दिला जातो आहे. विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता ठाणे एसटी विभागाने घेतली आहे. विभाग नियंत्रक विलास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम दररोज सुरू राहणार आहे. जिल्ह्यात ज्या शाळांना मोफत पास हवे असतील त्या शाळेने देखील जवळच्या एस टी आगाराची संपर्क साधावा एस टी कर्मचारी शाळेत येऊन पास देतील.
जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये म्हणून, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस आणि १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे. शाळेची बसची प मागणी असेल तर त्यांनी संबंधित आगाराची संपर्क साधावा बस फेरी चालू करता येईल.
विलास राठोड (एस टी ठाणे विभाग नियंत्रक)