स्फोटाच्या ठिकाणी सापडल्या तारा

By admin | Published: March 18, 2017 02:27 AM2017-03-18T02:27:22+5:302017-03-18T02:27:22+5:30

अंबरनाथच्या मिरचीवाडी येथील डोंगरावर झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी तारांचे तुकडे सापडले आहेत. यामुळे स्फोटाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

The star found in the explosion spot | स्फोटाच्या ठिकाणी सापडल्या तारा

स्फोटाच्या ठिकाणी सापडल्या तारा

Next

अंबरनाथ : अंबरनाथच्या मिरचीवाडी येथील डोंगरावर झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी तारांचे तुकडे सापडले आहेत. यामुळे स्फोटाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सुरुवातीला हा स्फोट मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या कमी क्षमतेच्या स्फोटकांमुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, घटनास्थळी बॉम्बशोधक पथकाला तारेचे तुकडे सापडल्याने हा स्फोट घडवण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकी कोणती स्फोटके होती, हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे.
गुरुवारी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आता तपास यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. स्फोटाची क्षमता ही तीव्र असल्याने स्फोटके आली कुठून आणि ती ठेवली कोणी, हेदेखील तपास यंत्रणेपुढील आव्हान आहे.
दगडखाणीतील स्फोटकांना एकत्रित करून त्या स्फोटाची चाचणी केली असावी किंवा जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरच्या मदतीने स्फोट घडवला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. हा स्फोट म्हणजे तयार केलेल्या बॉम्बची चाचपणी तर नाही ना, या दिशेनेही तपास सुरू आहे. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतर स्फोटकांची माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)

आदिवासींना नुकसानभरपाई द्या : किणीकर
दुसरीकडे या स्फोटामुळे ज्या आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना सरकारकडून भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे. आदिवासींच्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणीही केली आहे.

Web Title: The star found in the explosion spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.