आठवड्याभरात पुन्हा सुरु होणार स्टार ग्रेड अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:17 AM2017-08-02T02:17:45+5:302017-08-02T02:17:45+5:30
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या स्टार ग्रेड अॅप तीन महिन्यापासून बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर
ठाणे : रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या स्टार ग्रेड अॅप तीन महिन्यापासून बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी याबाबत पुढाकार घेऊन ते पुन्हा सुरु करण्यासाठी संबधींत विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार या अॅपचा डेमो सुरु झाला असून पुढील आठवड्यात तेपूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या अॅपवर केवळ खडड््यांविषयीच नाही तर इतर विभागांच्यादेखील तक्रारी करता येणार आहेत. त्यामुळे आता खºया अर्थाने ते अपग्रेड होणार आहे.
पावसाळ्यात शहरात किती खड्डे पडले, कोणत्या भागात पडले आणि ते बुजविण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली झाल्या, याबाबत पालिकेने मागील दोन वर्षापूर्वी स्टार ग्रेड नावाचे अॅप सुरु केले होते. याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. ते सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यावर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला होता. या तक्रारी तत्काळ संबधींत विभागाकडे दिल्या जात होत्या. तसेच याची कार्यवाई कोणत्या टप्प्यात आहे याची माहितीदेखील तक्रारदाराला दिली जात होती. त्यानंतर खड्डा बुजवल्यावरदेखील त्याचा फोटा अथवा माहितीचा मेसेज पाठविला जात होता. त्यामुळे शहरातील खडड््यांवर पालिकेने या अॅपच्या माध्यमातून नियंत्रण आणल्याचे दिसून आले होते. या अॅपसाठी पालिकेने तब्बल ४५ लाखांचा खर्च केला होता.
परंतु, यंदा मात्र शहरात खड्डे पडल्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी ठाणेकरांना पालिकेला फोन अथवा लेखी तक्रार करावी लागल्याचे दिसून आले. याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबधींत विभागाची बैठक घेऊन ते का बंद आहे, याची माहिती घेतली होती. त्यानंतर ते सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच हे अॅप सुरु करतांना त्यामध्ये केवळ खडड््यांविषयीच नाही तर पालिकेतील महत्त्वाच्या सर्व विभागांच्या तक्रारी त्यात करण्यासंदर्भातील सुचना केल्या होत्या. त्यानुसार संबधींत विभागाने आता या अॅपचा डेमो सुरु केला असून नागरिकांना सध्या खडड््यांविषयी तक्रारी करता येत आहेत. परंतु, पुढील आठवड्यात ते अपग्रेड होणार असून त्यात बहुतेक सर्व विभागांच्या तक्रारी ठाणेकरांना करता येणार आहेत.