डोंबिवली पश्चिमेत पुन्हा बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:21 AM2017-08-05T02:21:49+5:302017-08-05T02:21:49+5:30
केडीएमटीने फेब्रुवारीमध्ये पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरून दोन मार्गांवर रिंगरूट बससेवा सुरू केली होती. मात्र, रस्त्यांच्या कामांमुळे बंद पडलेले हे मार्ग आता पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी खुद्द केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याकडे केली आहे.
डोंबिवली : केडीएमटीने फेब्रुवारीमध्ये पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरून दोन मार्गांवर रिंगरूट बससेवा सुरू केली होती. मात्र, रस्त्यांच्या कामांमुळे बंद पडलेले हे मार्ग आता पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी खुद्द केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याकडे केली आहे.
‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला मंच’ने केडीएमटी सेवेच्या मागण्यांसंदर्भात २४ जुलैला पावशे यांना पत्र पाठवले होते. त्यातील प्रमुख मागण्यांची दखल घेत पावशे यांनी टेकाळे यांना नुकतेच निवेदन दिले. त्यात केडीएमटीच्या लोढा, नांदिवली-भोपर, पी अॅण्ड टी कॉलनी-नवनीतनगर, गोग्रासवाडी आदी मार्गांवरील बसफेºया वाढवण्याबाबत वेळोवेळी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. पण, त्याची अंमलबजावणी होत नाही. मार्ग क्र. ५१ डोंबिवली-मानपाडा-लोढा हेवन मार्गावर तीन बस, मार्ग क्र. ५८ डोंबिवली-पी अॅण्ट टी कॉलनी एक बस, मार्ग क्र. ५९ डोंबिवली-गोग्रासवाडी मार्गावर एक बस अशा धावत आहेत. मात्र, या फेºया अपुºया असल्याने वाढवण्याची गरज आहे.
ठरावीक अंतराने बस सुटाव्यात, वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन आणखी चार जादा बस वाढवाव्यात, अशी मागणी पावशे यांनी केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील मार्ग क्र.७१ व ७१ या रेल्वेस्थानकापासून कोपर रोड आणि फुले रोडमार्गे दीनदयाळ रोडमार्गे पुन्हा स्थानकाला येणाºया बस नियमितपणे सुरू कराव्यात, अशीही मागणी आहे. मंचच्या पत्राची पावशे यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल सदस्यांनी त्यांचे आभार मानले.