ठाणे-बेलापूर रोडवरील उड्डाणपूल सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:56 AM2018-05-13T05:56:05+5:302018-05-13T05:56:05+5:30
ठाणे-बेलापूर रोडवरील घणसोली व सविता केमिकल कंपनीजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे ते वाहतुकीसाठी खुले करावे.
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवरील घणसोली व सविता केमिकल कंपनीजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे ते वाहतुकीसाठी खुले करावे. भुयारी मार्गासह इतर कामे वेगाने पूर्ण करावी, अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
एमएमआरडीएच्या वतीने ठाणे- बेलापूर रोडवर दोन उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. खासदार राजन विचारे, एमएमआरडीएचे उपअभियंता गुरुदत्त राठोड, बांधकाम करणाºया कंपनीचे व पोलीस अधिकाºयांनी कामांची पाहणी केली. या मार्गावरील वाहतूककोंडी वाढू लागली आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे तत्काळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करावे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्यामुळे ठाणे-बेलापूर रोडवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून, वारंवार चक्काजाम होत आहे. घणसोली व सविता केमिकल जवळील पुलाचे काम पूर्ण झाले असून कोणाच्या उद्घाटनाची वाट न पाहता ते खुले करावे, अशा शब्दात विचारे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. ठाणे- बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी सोडवून प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे. या मार्गावर भुयारी मार्गाचेही काम सुरू आहे.