रात्रशाळा शिक्षकांच्या समायोजनास सुरुवात
By admin | Published: January 9, 2017 07:25 AM2017-01-09T07:25:09+5:302017-01-09T07:25:09+5:30
संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा रात्र शाळेत समायोजित करून घेण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.
ठाणे : संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा रात्र शाळेत समायोजित करून घेण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. याचा राज्यातील २२५ रात्र शाळेच्या शिक्षकांना याचा लाभ होत आहे. एकाच शाळेत शिकवणाऱ्या या रात्र शाळेच्या अतिरिक्त ठरेलेल्या शिक्षकांचे समायोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. मात्र, ठाणे, मुंबई परिसरातील बहुतांशी शाळेचे मुख्याध्यापक या शिक्षकांना हजर करून न घेता त्यांची अवहेलाना करीत असल्याचे निदर्शनात आले होते.
रात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे ३५ हजार ८३० विद्यार्थी राज्यभरात शिक्षण घेत आहे. त्यांना शिकविणारे एक हजार ६८८ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षक संचमान्यतेच्या धोरणानुसार अतिरिक्त ठरविले होते. मात्र, यापैकी जे शिक्षक एकाच रात्र शाळेतच शिकवित आहेत, दुसऱ्या कोणत्याही शाळेत ते शिकवित नसून अन्य ठिकाणचे वेतनही घेत नसलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेला आहे. यानुसार संबंधीत शिक्षकांचे राज्यभर समायोजनाचे काम सुरू झाले आहे.
यानुसार यानुसार मॉडर्न नाईट हायस्कूल, मुंबई सेंट्रल येथील रात्र शाळेचे मुख्याध्यापक भा. म. वाघमारे यांच्याकडून दर्शना पांडव या शिक्षिकेला हजर करून घेण्यात आले नाही. ठाण्यात राहणाऱ्या या शिक्षिकेला शाळेतून हाकलून देण्याची असभ्य भाष्य ते रात्रीच्या वेळी वापरत असल्याचे पांडव यांनी उपसंचालकांना लेखी कळविले आहे. तरीदेखील त्यांना शाळेत सामावून घेण्यात आले नाही. (प्रतिनिधी)