वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करा; शिवसेना व युवा सेनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

By अजित मांडके | Published: September 17, 2022 04:26 PM2022-09-17T16:26:24+5:302022-09-17T16:27:56+5:30

ठाणे  रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा असे नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Start Vendat project in Maharashtra Shiv Sena and Yuva Sena demand to Prime Minister Modi | वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करा; शिवसेना व युवा सेनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करा; शिवसेना व युवा सेनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

googlenewsNext

ठाणे  : वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करावा या मागणीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना व युवासनेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मात्र याच वेळी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र यावेळी शिवसेनेने ईडी सरकार हाय हायच्या घोषणा दिल्या, तर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा होच्या घोषणा दिल्या. यामुळे या भागात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ठाणे  रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा असे नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्वाक्षरी मोहिमेत शिवसेनेचे खासदार राजन विचारे, महिला आघाडी अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रत ३० मे २०१९ च्या दिवसाची आठवण करून दुस:यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेताना आम्हा देशवासीयांना ग्वाही दिली होती की देशाच्या संविधानाचा आदर करून कोणताही पक्षपातीपणा न करता देशातील सर्व जनतेच्या विकासासाठी कार्य करीन परंतु आज आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक लाख रोजगार निर्मिती होणारा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातला नेल्याने महाराष्ट्रावर एक प्रकारचे अन्याय केल्याचे दिसून आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

दरम्यान या स्वाक्षरी मोहीमच्या वेळेस भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी हजर झाल्या होत्या. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी देखील स्टेशन बाहेर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला पदाधिकारी येताच, ईडी सरकार हाय हाय च्या घोषणा शिवसेनेकडून देण्यात आल्या. तर भाजपने देखील कुणाचे सरकार आपले सरकार, देवेंद्रजी आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या. या निमित्ताने उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
 

Web Title: Start Vendat project in Maharashtra Shiv Sena and Yuva Sena demand to Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.