‘प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:42+5:302021-05-11T04:42:42+5:30

मीरा रोड : मीरा-भाईंदर मनपाच्या लसीकरण केंद्रात अन्य शहरांतील नागरिक येऊन लसीकरण करत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक लसीकरणापासून वंचित ...

‘Start ward wise vaccination center’ | ‘प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा’

‘प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा’

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर मनपाच्या लसीकरण केंद्रात अन्य शहरांतील नागरिक येऊन लसीकरण करत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत असल्याने प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केली आहे.

मनपाची शहरात १२ लसीकरण केंद्रे आहेत. शहरातील लोकसंख्येनुसार मनपाला लसींचा पुरवठा होत आहे. परंतु, अन्य शहरातील नागरिक मीरा-भाईंदरमध्ये लस घेऊन जात असल्याने लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. त्याचा फटका स्थानिकांना बसत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी मुंबई मनपाच्या धर्तीवर प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावीत. भाईंदर मनपाच्या २४ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केल्यास शहरातील नागरिकांचे लसीकरण लवकर होईल, असे पाटील यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

-----------------

Web Title: ‘Start ward wise vaccination center’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.