होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:24 AM2019-04-09T00:24:57+5:302019-04-09T00:25:09+5:30

अंबरनाथकरांना दिलासा : सहा महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

Starting the home platform | होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू

होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू

अंबरनाथ : अंबरनाथ फलाट क्र.-१ आणि २ वर लोकल आल्यावर होणारी प्रवाशांची गर्दी तसेच रेल्वे पादचारी पुलावर चढताना होणारी दमछाक कमी करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून सुरू आहे. अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्मच्या प्रस्तावित कामाला रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. सहा महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे.


अंबरनाथ फलाट क्र.-१ आणि २ हे एकत्र असल्याने दोन्ही स्थानकांत लोकल आल्यावर येथे प्रवाशांची गर्दी होते. येथून बाहेर पडण्यासाठी कर्जत दिशेला एकमेव पूल असून तो पूलही अरुंद आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावर गर्दीचा सामना करावा लागत होता. येथे होम प्लॅटफॉर्मसाठी जागा उपलब्ध असतानाही रेल्वे प्रशासन येथे होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव पुढे करत नव्हते. मात्र, मुंबईतील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारानंतर अंबरनाथच्या पुलावरही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची जाणीव रेल्वे प्रशासनाला करून देण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी पर्यायी पुलासोबत होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव सादर करण्यात आला. रेल्वे बोर्डाने अंबरनाथ स्थानकात होम प्लॅटफॉर्मला मंजुरी दिली होती. मात्र, ते काम निविदा प्रक्रियेत अडकले होते. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाने अंबरनाथमधील होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू केले आहे. पश्चिम भागातील स्वामीनगर भागाला लागूनच या प्लॅटफॉर्मचे काम सुरू करण्यात आले आहे. स्वामीनगरचा नाला ते आॅर्डनन्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या रेल्वेरुळांपर्यंत होम प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येणार आहे.


या कामासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या आरक्षण तिकीट खिडकीचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या तिकीट खिडकीजवळ उभारण्यात आलेल्या एस्कलेटरलाही होम प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांना एस्कलेटरचा वापर करणे सोपे होणार आहे. तसेच स्थानकात उतरणाºया प्रवाशांना लागलीच रिक्षास्टॅण्डपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.


आरक्षण केंद्रासाठी १६ वृक्ष तोडण्याची परवानगी
च्अंबरनाथ येथील तिकीट आरक्षण केंद्र हे पश्चिम भागातून हलवण्यात येणार आहे. हे केंद्र पूर्व भागात येणार आहे.
च्पूर्व भागात आरक्षण केंद्र उभारण्यासाठी रेल्वेच्या ताब्यातील जागेचा वापर करण्यात येणार आहे. पूर्व भागातील तिकीट खिडकीला लागूनच नवीन आरक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
च्त्यासाठी पालिकेकडे १६ वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली आहे. ती मिळताच आरक्षण केंद्राचे काम सुरू होईल. होम प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल उभारून तो मुंबई दिशेला जोडण्यात येणार आहे. हे स्थानकाचे काम करत असताना पालिकेच्या शौचालयाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यास सांगितले आहे.

Web Title: Starting the home platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल