कल्याण पूर्वमध्ये अद्यावत रुग्णालय व क्रीडासंकुल उभारणार - श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:59 PM2020-11-10T15:59:56+5:302020-11-10T16:00:24+5:30
Shrikant Shinde : महापालिका हद्दीत महापालिकेच्या मालकीची केवळ दोन रुग्णालये आणि पंधरा हेल्थ पोस्ट आहे.
कल्याण : कल्याण पूर्वमधील तिसगाव नजीक शंभर फूटी रस्त्यालगत रुग्णालय आणि क्रिडा संकुलासाठी आरक्षित भूखंड आहे. हा भूखंड ताब्यात घेऊन त्या जागेवर रुग्णालय व क्रिडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरु करावी अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिल्या आहेत.
महापालिका हद्दीत महापालिकेच्या मालकीची केवळ दोन रुग्णालये आणि पंधरा हेल्थ पोस्ट आहे. महापालिकेची लोकसंख्या लक्षात घेता. रुग्णालयांची संख्या जास्त असणो आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात नागरीकांना उपचार घेणो आर्थिक दृष्टय़ा परवडत नाहीत. त्यासाठी महापालिकेची रुग्णालये सुरु झाल्यास त्यांना आरोग्य उपचारासाठी दिलासा मिळू शकतो. महापालिकेच्या सभेत नुकताच रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कल्याण पूव्रेत १०० फूटी रस्त्यालगत रुग्णालय व क्रीडा संकुलासाठी आरक्षीत भूखंड आहे. हा भूखंड ताब्यात घेण्याची सूचना खासदार शिंदे यांनी केली होती. त्यानुसार काल पार पडलेल्या महासभेत हा भूखंड ताब्यात घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी.
रुग्णालयाकरिता लागणारी साधनसामग्रीसाठी लागणारा निधीच्या प्रस्ताव तयार करण्यात यावा. हा प्रस्ताव प्रशासनाने तातडीने करुन तो राज्य सरकारकडे तातडीने पाठविण्यात यावा. अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना खासदार यांनी दिल्या आहे. केवळ रुग्णालयच नव्हे. तर कल्याण पूव्रेत अद्यावत क्रीडा संकुल नाही. डोंबिवलीत असलेल्या सावळाराम क्रिडा संकुलाच्या धरतीवर कल्याण पश्चिमेत क्रीडासंकुल उभारल्यास कल्याण पूव्रेसह ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. कारण कल्याण पूव्रेत असलेल्या दाट लोकवस्तीमुळे त्याठिकाणी मैदानांची संख्या कमी आहे. मैदाने खेळ खेळण्यासाठी क्रीडा संकुलाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन खासदार यांनी कल्याण पूव्रेत क्रीडा संकुल उभारण्याचा पाठपुरावा सुरु केला आहे.