पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क दुय्यम अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:03 PM2023-12-07T22:03:45+5:302023-12-07T22:03:59+5:30
पालघर :- वडराई येथील बिअर दुकानाच्या परवानासाठी लाच मागणाऱ्या पालघर च्या उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नितीन बाबू संखे ...
पालघर:- वडराई येथील बिअर दुकानाच्या परवानासाठी लाच मागणाऱ्या पालघर च्या उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नितीन बाबू संखे ह्यांच्या विरोधात पालघरच्या लाचलुचपत विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाऱ्याने त्यांच्या पत्नीचे नावे बियर दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज केला होता. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दुय्यम निरीक्षक पदावर असलेल्या नितीन संखे यांनी तक्रारदारांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बियर दुकानाचा परवाना देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाभ देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविरुद्ध 20 नोव्हेंबर रोजी पालघरच्या लासलुचपत विभागाकडे तक्रार दिली.
पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक दयानंद गावडे यांनी या प्रकरणी पंचासमक्ष लाचेची मागणी करतात याची पडताळणी केली. यावेळी बियर शॉप चे लायसन देण्याकरता चार लाखाच्या मागणी नुसार तडजोडीअंती ३ लाख ४० हजार रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपाधीक्षक गावडे यांनी सांगितले