राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी राज्यशासन सकारात्मक - लोढा

By सुरेश लोखंडे | Published: September 1, 2022 08:32 PM2022-09-01T20:32:38+5:302022-09-01T20:35:23+5:30

"स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे."

State government positive for increase in salary of Anganwadi workers in the state - Lodha | राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी राज्यशासन सकारात्मक - लोढा

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी राज्यशासन सकारात्मक - लोढा

googlenewsNext

ठाणे: राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्याच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. त्यासाठी विभागाने प्रस्ताव पाठवावा, त्यावर मंत्रीमंडळात योग्य निर्णय घेऊ, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाणे येथील कार्यक्रमात आज स्पष्ट केले.

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित ५ व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ लोढा यांच्या हस्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत ठाण्यातील काजूवाडी येथील महानगरपालिका शाळेत आज झाला. यावेळी जेष्ठ महिला सुमित्रा गुप्ता, उपायुक्त गोकुळ देवरे, एकात्मिक सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह लाभार्थी महिला, बालके व नागरिक उपस्थित होते. 

             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मूल सक्षम तर देश सक्षम असा संदेश दिला होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन काम करत आहे. यावेळी राष्ट्रीय पोषण महिना शुभारंभानिमित्त सकस पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन लोढा व सुमित्रा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोढा यांनी अंगणवाडीतील बालकांशी व अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून पोषण आहाराविषयी माहिती घेतली. गरोदर महिला व सुदृढ बालकांना सकस फ्रूट बास्केट, स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप लोढा व म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

       गरोदर महिलांना योग्य व सकस आहार दिल्यास बालकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. अनेक महत्त्वाचे उपक्रमही या विभागाच्या वतीने घेण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा, असेही प्रतिपादन म्हस्के यांनी यावेळी केले. या पोषण महिना कार्यक्रमाव्दारे राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या काळात एक लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांचे वजन तपासणे, सकस आहारासंबंधी जनजागृती करणे, महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा आदीं माहिती अग्रवाल यांनी यावेळी दिली.  

Web Title: State government positive for increase in salary of Anganwadi workers in the state - Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.