राज्य सरकारने गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:45+5:302021-06-30T04:25:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या नियमावलीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करावा. तसेच, महाराष्ट्राचा ...

The state government should reconsider the Ganeshotsav rules | राज्य सरकारने गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करावा

राज्य सरकारने गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या नियमावलीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करावा. तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा सुपुत्र या नात्याने निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव पाहता याही वर्षी गणेश भक्तांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा यासाठी मंगळवारी राज्य सरकारने सूचनावली जाहीर केली. यात मूर्तीची उंची, देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन आणि विसर्जन मिरवणूक यासारख्या अनेक मुद्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ठाणे, मुंबईमधील सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे समितीने सांगितले. सर्व मंडळांशी सर्वसहमतीने या निर्णयाबाबत चर्चा करून पुढील निर्णय लवकरच घेऊ. पण जर का हा निर्णय राजकीय प्रेरित असेल तर मी एवढेच म्हणेन, भगवान के घर मे देर है अंधेर नही. गणेश भक्तांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या निर्णयावर फेरविचार करावा, असे मत समिती अध्यक्ष समीर सावंत यांनी व्यक्त केले.

Web Title: The state government should reconsider the Ganeshotsav rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.