ठाण्यात राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सव; एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री दादा भुसेही राहणार उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 06:26 PM2021-08-08T18:26:59+5:302021-08-08T18:27:34+5:30

ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचं रानभाज्यांचे प्रदर्शन व रानभाज्या विक्री साठी ठेवण्यात येणार आहेत.

State Level Ranbhajya Vegetable Festival in Thane; Along with Eknath Shinde, Agriculture Minister Dada Bhuse will also be present | ठाण्यात राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सव; एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री दादा भुसेही राहणार उपस्थिती

ठाण्यात राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सव; एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री दादा भुसेही राहणार उपस्थिती

Next

ठाणे: जागतीक आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात सोमवारी राज्यस्तरीय रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित केला आहे. फेडरेशन हास  रोड नं. १६, वागळे इंस्टेट येथे सोमवारी पार पडणार आहे. यावेळी मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषीमंत्री दाद भुसे देखील उपस्थित राहणार आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचं रानभाज्यांचे प्रदर्शन व रानभाज्या विक्री साठी ठेवण्यात येणार आहेत. निसर्गतः उपलब्ध होणा या रानभाज्या नैसर्गिक सेंद्रिय असून सर्व प्रकारची जीवनसत्वे व औषधी गुणधर्म संपन्न आहेत. 

आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे, त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे. या करिता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन या  रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृध्दी ही संकल्पना अवलंबण्याचे राज्य शासनाच्या कृषि विभागाचे धोरण आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या या भाज्या पावसाळयाच्या सुरवातीला येतात. 

या भाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या भाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजीत करणेत आली आहे. या प्रदर्शनात करटोली, रानकंद, अळूची पाने, कोळूची भाजी, चाईची भाजी, सिंधनमाकड, भारंगी, काटवल, घोळ आदी रानभाज्या उपलब्ध होणार आहेत. या राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सव शुभारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रो.ह.यो. व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री, डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री अदिती तटकरे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, ठाणे महापौर नरेश म्हस्के, कृषी सचिव एकनाथ डवले या रानभाज्या प्रदर्शन व विक्रीस जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक  अंकुश माने यांनी केले आहे.

शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेताच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात. यामध्ये कोळी, गोंड, गोवारी, ढिवर या चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य आदिवासी जमाती दैनदिन खाद्यान्नात सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे आणि त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. 

या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यापासून तयार केले जाते. एवढेच नव्हे, तर पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.


महाराष्ट्रात उगवणाऱ्या काही रानभाज्या- 

• कुसरा, कुळू, कोरड, कोलासने, चवळी, बड़दा, बहावा, बांबूचे कोंब • बेरसिंग बोखरीचा मोहर • कोवळे बांबू • बोडारा. • भारी , कोळू, कौला • घाळ. भुईपालक.• भोकर • महाळुंग • अमरकंद • अळंबी • आघाडा • आचकंद • आलिंग • उळशाचा मोहर • कडकिंदा • कवदर • कवळी • काटे-माठ महाळुंग • माठ• माड • मोखा • मोहदोडे • रक्त कांचन• रताळ्याचे कोंब • रानकेळी • रानतोडले • राक्षस

जंगला लगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतुनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यानातील अविभाज्य घटक आहेत.

भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात कोरकू, गोड भिल्ल, महादेव कोळी, वारली. अशा ४० जमाती आहेत. जगभरात वनस्पर्तीिच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात ९४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४० पाळभाज्या. १९८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत.

Web Title: State Level Ranbhajya Vegetable Festival in Thane; Along with Eknath Shinde, Agriculture Minister Dada Bhuse will also be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.