राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडाच्या दोन दिवसीय स्पर्धा सुरु; जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन

By सुरेश लोखंडे | Published: December 8, 2023 07:26 PM2023-12-08T19:26:59+5:302023-12-08T19:27:11+5:30

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

State level school weightlifting sports two-day competition begins Inauguration by District Collector |  राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडाच्या दोन दिवसीय स्पर्धा सुरु; जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन

 राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडाच्या दोन दिवसीय स्पर्धा सुरु; जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन

ठाणे: येथील ज्येष्ठ कवी व साहित्यिक स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक्स संकुल, पोखरण रोड-२, ठाणे (प). येथे १७,१९ वर्षाखालील मुले व मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२३-२०२४ आयोजन आले असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन आज करण्यात आले. या स्पर्धा ८ व १० डिसेंबर या कालावधीत पार पडत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे मार्फत या १७,१९ वर्षाखालील मुले व मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका उपायुक्त आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थी (क्रीडा) मिनल पालांडे, ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन सदस्य उज्ज्वला माने, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना पदाधिकारी प्रमोद चोळकर, अनिल माऊली, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना सह सचिव गणेश खानविलकर, छत्रपती पुरस्कारार्थी राजेश कामथे आदी उपस्थित होते.

या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातील अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व क्रीडा प्रबोधिनी या नऊ विभागातून १८० मुले, १८० मुली, ३६ संघव्यवस्थापक, तीन निवड समिती सदस्य, ३० तांत्रिक अधिकारी व इतर असे एकूण ५०० जण सहभागी झालेले आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची निवास व्यवस्था ठाणे आपत्ती निवारण दल (टी.डी.आर. एफ) येथे करण्यात आलेली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.
 

Web Title: State level school weightlifting sports two-day competition begins Inauguration by District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे