उल्हास नदी वाचविण्यासाठी रक्तांच्या ठशांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:55 AM2021-02-20T05:55:24+5:302021-02-20T05:55:24+5:30

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याण’ संस्थेच्यावतीने मोहने येथे नदी पात्रात गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

Statement of blood stains to save the river Ulhas | उल्हास नदी वाचविण्यासाठी रक्तांच्या ठशांचे निवेदन

उल्हास नदी वाचविण्यासाठी रक्तांच्या ठशांचे निवेदन

Next

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याण’ संस्थेच्यावतीने मोहने येथे नदी पात्रात गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त राजे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने रक्तांच्या ठशांचे निवेदन तयार करण्यात आले आहे. हे निवेदन उल्हास नदी बचाओ कृती समितीच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविले जाणार आहे.

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास बळ देण्याकरिता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रक्ताच्या ठशांचे निवेदन तयार केले आहे. हा नदी बचाओ आंदोलनाचाच एक भाग आहे. या निवेदनास उल्हास निर्मल जल अभियान कर्जत नेरळ, यूथ ऑफ टुडे बदलापूर- अंबरनाथ, वालधुनी बिरादरी आणि वॉटर फाउंडेशनचा पाठिंबा मिळत आहे. नदी प्रदूषित होत असल्याने नदीत जलपर्णी उगवली आहे. प्रदूषित पाण्यामुळे लोकांना पोटाचे आणि त्वचेचे आजार होत आहेत. नदी उगमापासून पायथ्यापर्यंत प्रदूषण मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्यावतीने निकेश पावशे यांच्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

चौकट

मोहने नाल्यावर धरणे आंदोलन

उल्हासनदी बचाओ कृती समितीच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून नदी प्रदूषण रोखण्यासाठी मोहने नाल्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समितीचे प्रमुख रवींद्र लिंगायत यांच्यासह अश्विन भोईर, राजन चव्हाण, अनिकेत व्यवहारे, निकेश पावशे, प्रशांत राऊत, नितीन पवार, प्रशांत शेडगे सहभागी झाले होते. नदी उगमापासून मोहने बंधाऱ्यापर्यंत प्रदूषित झाली आहे. या प्रदूषित नदीचा अभ्यासदौरा यापूर्वी समितीच्यावतीने करण्यात आला होता.

फोटो-कल्याण-रक्ताचे ठसे

-------------------------

Web Title: Statement of blood stains to save the river Ulhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.