शहापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:39+5:302021-03-15T04:36:39+5:30

किन्हवली : शहापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शहापूर शहर शिवसेनाप्रमुख विजय भगत यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ...

Statement to the Minister regarding water supply of Shahapur | शहापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत मंत्र्यांना निवेदन

शहापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत मंत्र्यांना निवेदन

Next

किन्हवली : शहापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शहापूर शहर शिवसेनाप्रमुख विजय भगत यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. ३० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.

नव्याने स्थापन झालेल्या शहापूर नगरपंचायतची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ११ हजार ६२३ असून सद्यस्थितीत ती ३५ ते ४० हजार असण्याची शक्यता आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय, बँका, पतपेढ्या या नगरपंचायत हद्दीत आहेत. मोठी बाजारपेठ व इतर नागरी सुविधा उपलब्ध असल्याने स्थलांतर वाढल्याने शहापूरचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यापासून नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. १९८३ मध्ये बांधलेल्या ३.५० दशलक्ष लीटर क्षमता असलेल्या पाणीपुरवठा योजनेला आता जवळपास ४० वर्षे झाली आहेत. नागरिकांची वर्दळ आणि लोकसंख्या विचारात घेता सर्वांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेची व जलशुद्धीकरण केंद्राची अत्यंत आवश्यकता आहे.

नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहरातील रस्ते, गटारे, पथदिवे, बगीचा, लघुपाणी योजना अशा प्रकारची विकासकामे झाली असून पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. नवीन पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३० कोटींची योजना मंजूर करून शहापूर नगरपंचायतीची महत्त्वाची समस्या मार्गी लावावी, अशी विनंती भगत यांनी केली आहे.

Web Title: Statement to the Minister regarding water supply of Shahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.