मुद्रांक विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून राज्यभर आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: July 13, 2023 07:08 PM2023-07-13T19:08:56+5:302023-07-13T19:09:05+5:30
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील कार्यालयाव रोधात दस्त नोंदणीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
ठाणे : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील कार्यालयाव रोधात दस्त नोंदणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात दुय्यम निबंधक श्रेणी १चे एच. आर. मते यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. या मनमानीचा निषेध करून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून गुरूवारी कामकाज केले. या गुन्ह्यातून मते यांचे नाव तत्काळ वगळण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या राज्यस्तरीय आंदोलनात ठाणे जिल्हह्यातीलही कार्यालयांमध्येही कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून आज कामकाज केले. नोंदणी विभाग हा शासनास मोठया प्रमाणात महसूल जमा करुन देणारा विभाग आहे. दाखल केलेल्या गुन्हयामध्ये दुय्यम निबंधक श्रेणी-१चे मते यांना सह आरोपी केल्यामूळे विभागाची व शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे नोंदणी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या भावना अतिशय तीव झाल्या आहेत.
याची दखल घेऊन मते यांचे नाव गुन्हह्यातून तत्काळ वगळण्यात यावे, तशी माहिती तत्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटनेने मोहाडी येथील पोलीस निरीक्षकांना दिला आहे. काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर कामकाज केले, या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मंगेश चौधरी,सचिव प्रवीण गिरी, कोष्याध्यक्ष संतोष देबड आदी पदाधिकाऱ्यांनी केले.