‘मेंटल’मधील स्टेशन मार्गी

By admin | Published: May 10, 2016 01:56 AM2016-05-10T01:56:32+5:302016-05-10T01:56:32+5:30

ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली.

Station route in 'Mantal' | ‘मेंटल’मधील स्टेशन मार्गी

‘मेंटल’मधील स्टेशन मार्गी

Next

ठाणे : ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली. हा प्रकल्प संयुक्त भागीदारीत पूर्ण करण्यावरही सहमती झाली. आठवडाभरात प्रकल्प अहवाल तयार करून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे.
कोपरी पुलाजवळ रेल्वे मार्गावर एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येणाऱ्या पुलाबाबतही सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. हे काम पावसाळ््यानंतर दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे.
खासदार राजन विचारे यांनी गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घऊन या प्रकल्पासाठी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याला समन्वयाचे काम देण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रभू यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता यांची नियुक्ती केली. विचारे यांनी तीन दिवस सातत्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकल्पाविषयी चर्चा केली. त्या पाशर््वभूमीवर ही बैठक पार पडली.
विस्तारित रेल्वे स्टेशनच्या सीमांकनाबाबत चर्चा झाली. ठाणे महापालिकेने या विस्तारित रेल्वे स्टेशनसाठी जे सीमांकन प्रस्तावित केले होते त्याला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून लवकरच हा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर सादर करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेच्यावतीने मे. बालाजी रेल रोड सिस्टम लि. ही सल्लागार संस्था करत आहे. तो आठवड्यात तयार करण्याची सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या. अहवाल तयार झाल्यानंतर पुढील आठवड्यात सुरेश प्रभू यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल, नितीन पवार, उप अभियंता राजकुमार पवार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Station route in 'Mantal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.