मध्यरात्रीपर्यंत छाननी सुरूच

By admin | Published: April 6, 2016 01:51 AM2016-04-06T01:51:38+5:302016-04-06T01:51:38+5:30

पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार

Sterilization by midnight | मध्यरात्रीपर्यंत छाननी सुरूच

मध्यरात्रीपर्यंत छाननी सुरूच

Next

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार कार्यालयात एकच झुंबड उडाली होती. त्यात स्वच्छतागृहाबाबत उमेदवारांच्या अर्जासोबत जोडावयाचा दाखला व उमेदवारीबाबत घेतलेल्या हरकतीमुळे रात्रभर छाननी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
पालघर जिल्'ातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे ३ हजार २६१ उमेदवार निवडून देण्यासाठी एकूण ९ हजार ४६० उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित तहसिलदार अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १ हजार १६२ प्रभाग असून अनुसूचित जातीचे ३० सदस्य, अनुसूचित जमातीचे २ हजार ७२५ सदस्य, मागास प्रवर्गासाठी १४९ सदस्य तर सर्वसाधारण ३५७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीचे काम जिल्ह्यातील तहसिलदारांमार्फत आज सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ६ एप्रिल (बुधवार) रोजी असल्याने एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहणार आहेत हे कळणार आहे. पालघर तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ९०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधून १ हजार ८११ उमेदवारी अर्ज, जव्हार तालुक्यात ४७ ग्रामपंचायतीमधून १ हजार ६९ अर्ज, वाडा तालुक्यातून ७० ग्रामपंचायतीमधून १ हजार ८१९ अर्ज, विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमधून १ हजार १७६ अर्ज, तलासरी तालुक्यातून १२ ग्रामपंचायतीमधून ६३५ अर्ज, मोखाडा तालुक्यातून २१ ग्रामपंचायतीमधून ६२९ उमेदवारी अर्ज, वसई तालुक्यातून ११ ग्रामपंचायतीसाठी ४१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.पालघर तहसिल कार्यालयासह अनेक ठिकाणी आज उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. उमेदवारासोबत असलेल्या राजकीय प्रतिनिधीच्या गर्दीमुळे पालघर तहसिल कार्यालयाचे आवार पूर्ण गच्च भरले होते तर त्यांनी आणलेली वाहने तहसिलदार कार्यालयासमोर बेशिस्त पद्धतीने पार्क करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. निवडणुक आयोगाने उमेदवाराकडे शौचालय असणे सक्तीचे केल्याने ते दाखले मिळविणे यासाठी २८ मार्च रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या विशेष ग्रामसभेची माहिती उमेदवारापर्यंत पोहचली नसल्याने बऱ्याच उमेदवारांना शौचालयाचा दाखला आपल्या अर्जासोबत जोडता आलेला नाही.

Web Title: Sterilization by midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.