उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार
By सदानंद नाईक | Published: March 29, 2023 04:00 PM2023-03-29T16:00:45+5:302023-03-29T16:01:31+5:30
उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली
उल्हासनगर : शहरातील कुत्र्याच्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेने १ मार्च पासून कुत्र्याचे निर्बीजीकरण सुरू केले. अवघ्या ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्याची माहिती उपायुक्त दिपक जाधव यांनी दिली असून मांजरीचेही निर्बीजीकरण करण्याचे संकेत त्यांनी दिले.
उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली. शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात दररोज ४० पेक्षा जास्त कुत्रा चावल्याच्या नोंद होत आहे. यापूर्वी महापालिकेने कुत्र्याचे निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान गेली १० वर्षा पेक्षा जास्त काळ प्रक्रिया ठप्प पडल्याने, कुत्र्याच्या संख्येत वाढ झाली. एका वर्षात ३ हजार पेक्षा जास्त कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याचे टार्गेट महापालिका आरोग्य विभागाने ठेवले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्वान निर्बीजीकरण केंद्राचे उदघाटन झाल्यानंतर, १ मार्च पासून प्रत्यक्षात श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू केली. दररोज २० ते २५ कुत्र्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात असून ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्याची माहिती महापालिका उपायुक्त डॉ दीपक जाधव यांनी दिली आहे.
महापालिकेने अद्यावत श्वान निर्बीजीकरण केंद्र बांधले असून केंद्रात श्वानावर शस्त्रक्रिया केली जाते. निर्बीजीकरणासाठी कुत्र्याला ज्या परिसरातून आणले जाते. त्याच परिसरात शस्त्रक्रिया केल्यानंतर सोडले जाते. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर, कुत्र्याला डॉक्टर यांच्या निघराणी खाली उपचारासाठी ५ दिवस ठेवून त्यांना पूरक व योग्य आहार दिला जातो. त्यानंतर सोडून दिल्यावर, त्याची निघराणी विशेष पाठकाद्वारे ठेवली जाते. एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणावर महापालिका ९५० रुपये खर्च केला जात असून निर्बीजीकरण शास्त्रकीया सुरूच ठेवण्याचे संकेत डॉ दीपक जाधव यांनी दिले. कुत्र्या सोबत पाळीव व भटक्या मांजरीचीही निर्बीजीकरण करण्याची माहिती उपायुक्त जाधव यांनी देऊन नागरिकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र गेल्या एका महिन्यात एकाही मांजरीचे निर्बीजीकरण झाले नाही.
भटक्या मांजरी टार्गेटवर
शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी श्वान व मांजरीचे निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण झाले असतांना, मांजरीच्या निर्बीजीकरणाने उदघाटनच झाले नाही. असे गंमतीने म्हटले जात असून भटक्या मांजरीवर महापालिकेच्या टार्गेटवर आले आहे.