दांडी मारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:43 AM2018-05-05T06:43:27+5:302018-05-05T06:43:27+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त उल्हासनगर पालिकेत आयोजित कार्यक्रमाला सत्ताधारी भाजपा तसेच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांना दांडी मारताना लाज कशी वाटली नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचा समाचार घेतला. भारत मोदीमुक्त व्हावा, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
उल्हासनगर - महाराष्ट्र दिनानिमित्त उल्हासनगर पालिकेत आयोजित कार्यक्रमाला सत्ताधारी भाजपा तसेच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांना दांडी मारताना लाज कशी वाटली नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचा समाचार घेतला. भारत मोदीमुक्त व्हावा, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
टाउन हॉलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज १० वर्षांनंतर येथे आल्याने त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आकर्षण होते. पदाधिकाºयांच्या नियुक्त्यांवरून मनसेत नाराजी व्यक्त केली गेली. ‘आमच्या मनसेच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले’ असे वृत्त शुक्रवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. यावरून पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. राज यासंदर्भात कुठली भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. पक्षातील नाराजीची राज यांना कल्पना आल्यावर नव्याने पदाधिकाºयांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे संकेत त्यांनी दिले.
राज्यात कोणताही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी शेतकºयांच्या जमिनी मातीमोल भावाने परप्रांतीय व गुजराती खरेदी करतात. त्यानंतर, नाणारसारखा प्रकल्प उभारला जातो. या परिस्थितीला नरेंद्र मोदी यांची राजवट जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. नेवाळीतील शेतकºयांवरील अन्यायप्रकरणी मी लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मनसे विरोधी भूमिकेत
महापालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक नसतानाही मनसेच्या पाठपुराव्यामुळे महापालिका शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी झाली असून पाच कोटींच्या निधीतून अद्ययावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभी राहिली आहे. मनेसेने प्रत्येकवेळी विरोधी पक्षाची भूमिका वठवल्यामुळे ही कामे झाली, असे राज यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांचा उत्साह
टाउन हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांची झालेली गर्दी पाहून आपण उल्हासनगरमध्ये सभा घेऊ, असे आश्वासन राज यांनी दिले.